नांदेड(प्रतिनिधी)-आधार अपडेट करण्यासाठी डाक कार्यालयात होणाऱ्या गर्दीमुळे दोन महिलांची हाणामारी झाल्याची घटना आज घडली. नांदेड प्रशासनाकडे 87 किट पाठविण्यात आले आहेत. मग अशी गर्दी एकत्र का होत आहे. याचे नियोजन का होत नाही असे अनेक प्रश्न आजच्या घटनेतुन समोर आले आहेत.
अनेक वेळेस सकाळी 5.30 ते 6 वाजता पुरूष आणि महिलांची डाक कार्यालयाच्या कुलूप लावलेल्याा गेटसमोर रांग पाहुन अनेकदा प्रश्न उपस्थित होत होते की, ही मंडळी येथे काय करत आहे. नंतर याचा उलगडा झाला. की, आधार कार्ड अपडेट करण्यासाठीचे अधिकार डाक कार्यालयाकडे दिले आहेत. या संदर्भाने दररोज हा घटनाक्रम सुरू हच होता. परंतू आज एक वेगळाच प्रकार तेथे घडला जो कोणी तरी आपल्या मोबाईलमध्ये कैद करून व्हायरल केला. या संदर्भाने व्हिडीओ पाहिला असता असे दिसते की, नांदेडसाठी 87 आधार किट देण्यात आले होते. मग नांदेड जिल्ह्याजत फक्त 16 तालुके आहेत. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या मानाने तालुक्यातील गर्दी कमी आहे. याचा अर्थ नियोजन बरोबर करण्यात आले नाही असे दिसते. आज तेथे जमलेल्या गर्दीत दोन महिलांमध्ये काही कारणामुळे वाद झाला. महिलांनी एक दुसऱ्याला सेवा करण्यास सुरूवात केले. एक व्यक्ती महिलांच्या भंाडणात जावून एका महिलेला बाजुला केले तर ती महिला त्याला सुध्दा सेवा देत होते आणि महिलेला कसा हात लावतोस . एखाद्या पुरूषाने महिलेच्या शरिराव साधा स्पर्ध जरी केला तर तो महिलेचा विनयभंग होतो. आता त्या महिलेला भांडणातून बाजूला काढणे हा विनयभंग होईल काय? यानंतर महिलेने त्यानंतर त्या पुरूषाला केलेली सेवा कायद्याच्या कोणत्या भाषेत बसेल आणि याचे उत्तर देईल कोण? कारण भारतात आणि त्यापेक्षा भारी नांदेड जिल्ह्यात पोलीस खाते करील तेच होईल हा प्रकार चालतो. डाक विभागाने त्यांच्याकडे आधार अपडेट साठी होणारी गर्दी लक्षात घेवून त्याचे नियोजन करणे आवश्यक होते. त्यांच्याकडून नियोजन होत नाही तर पोलीस विभागाला सांगायला हवे होते. कारण डाक विभाग आणि नांदेड जिल्ह्यात असलेले पोलीस अधिक्षक हे दोन्ही भारतीय सेवेतील लोक आहेत. कमीत कमी आज घडलेल्या प्रकारानंतर तरी डाक विभागात अशी गडबड होवू नये म्हणून पर्यायी व्यवस्था तयार करायला हवी अशी चर्चा डाक विभागात झालेल्या भांडणानंतर होत आहे. नांदेड जिल्ह्याला 87 किट देण्यात आले असतील तर त्याची माहिती आजपर्यंत का जनतेला देण्यात आली नाही हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. कारण दिलेले किट हे 31 जानेवारी 2024 पर्यंत देण्यात आले होते. असा अभिलेख आहे. मग गर्दी होणाऱ्या जागी जास्त किट असावेत किंवा जागा वेगवेगळ्या सुनिश्चित व्हाव्यात याचे नियोजन कोण करेल. जनतेला तर आपले आधार कार्ड त्वरीत प्रभावाने अपडेट करून घेणेच आहे.
संबंधित व्हिडिओ..
