अर्धापूर (प्रतिनिधी)-येथील पंचायत समिती अंतर्गत असणारे महिला व बाल कल्याण विभागात कार्यरत महिला लिपीकाला पत्रकार कार्यालयाचे दार उघडे असतांना ते दार बंद करून त्याचे फोटो वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून त्रास देत असल्याचा प्रकार घडत आहे. पत्रकारांनी असे करायला हवे काय? हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.
अर्धापूर येथे पंचायत समिती अंतर्गत महिलाव बाल कल्याण विभागात कार्यरत लिपीक महिलेने वास्तव न्युज लाईव्हला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कार्यालयात नागोराव दिगंबर भांगे आणि गव्हाणे नावाचे पत्रकार आले आणि त्यावेळेस या महिला व्यक्तीगत कारणामुळे बाजूच्या रुममध्ये होत्या. तेंव्हा त्या पत्रकारांनी कार्यालयाचे दार बंद करून त्याचा फोटो काढला आणि तो फोटो लिपीक महिलेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठवून त्रास दिला आहे. महिलेच्या सांगण्याप्रमाणे कार्यालयात कोणी नव्हते तर त्याची विचारणा करायला हवी होती. पण अशा पध्दतीने स्वत:च दार बंद करून बंद दाराचा फोटो काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवणे कितपत योग्य आहे. सोबतच महिला सांगत होत्या की, मलाच उलट सुलट बोलून भांगे आणि गव्हाणे त्रास देत आहेत. याबद्दल दु:ख व्यक्त करतांना त्यांनी सांगितले की, पत्रकारांनी चुकलेल्या बाबी जगासमोर आणणे त्यांची जबाबदारी आहे. पण आपणच तयार करून त्या बाबी चुक आहेत असे दाखविण्याचा अधिकार पत्रकारांना नाही.
पत्रकारांचा लिपीक महिलेला त्रास
