नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीची 50 हजार रुपयांची पिशवी चोरून नेणाऱ्या चोरट्याला जनतेने पकडून पोलीसांच्या स्वाधीन केल्याची घटना हिमायतनगर येथे 28 मे रोजी दुपारी घडली आहे.
वारंग टाकळी ता.हिमायतनगर येथील रामदास उत्तमराव हनवते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 मे रोजी बस स्टॅंड समोर ते उभे असतांना दुपारी 1 ते 1.30 वाजेदरम्यान एक व्यक्ती त्यांच्या हातातील 50 हजार रुपये रोख रक्कम असलेली पिशवी घेवून पळाला. त्या चोरट्याने दुसऱ्या एका व्यक्तीचे 10 हजार रुपये चोरले. बाजारातील लोकांनी अर्थात जनतेने आणि रामदास हनवते यांनी त्या चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याचे नाव प्रितम दशरथ चव्हाण (30) रा.वाटूरफाटा ता.परतूर जि.जालना असे आहे. लोकांनी पकडल्यानंतर त्याच्याकडून 30 हजार रुपये मिळाले आहेत. उर्वरीत पैसे कोण्या इतराकडे दिले असतील. या तक्रारीवरुन हिमायतनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 113/2025 दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक नामदेव मद्दे अधिक तपास करीत आहेत.
50 हजार रुपये चोरणाऱ्या चोरट्याला जनतेने पकडले
