भोकर :- महाराष्ट्र शासन सार्वजानिक आरोग्य विभाग अंतर्गत मा.अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन व शालेय शिक्षण पुणे यांनी सुचित केल्यानुसार राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत मा. डॉ निळकंठ भोसीकर साहेब जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, मा. डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, नोडल अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे, यांच्या सुचनेनुसार व मा. डॉ प्रताप चव्हाण सर वैद्यकिय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनानुसार आज दि २८ मे रोजी ” मासिक पाळी स्वच्छता दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा करण्यात आला.
महिलांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी आणि सन्मानासाठी मासिक पाळी स्वच्छता महत्त्वाची आहे. दुर्दैवाने, सामाजिक निषिद्ध आणि योग्य मासिक पाळी स्वच्छता ज्ञानाच्या अभावामुळे, अनेक महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात आव्हानांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो. मासिक पाळीच्या आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थापनाच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी ” मासिक पाळी स्वच्छता दिवस ” साजरा करण्यात येतो.
डॉ माया नरवाडे वैद्यकिय अधिकारी, अधिपरीचारीका राजश्री ब्राम्हणे यांनी मासिक पाळी मध्ये महिलांनी घ्यावयाची काळजी, मासिक पाळीचे समज- गैरसमज व स्वच्छते बदल मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक आरकेएसके समुपदेशक सुरेश डूम्मलवाड यांनी केले.
यावेळी महिला रुग्ण ग्रामीण रुग्णालय भोकर येथील जिजा भवरे अधिपरीचारिका, रोहिणी भेटकर क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी, मल्हार मोरे औषध निर्माण अधिकारी, एनसीडी समुपदेशक रेणुका भिसे, भालेराव सिस्टर, आरोग्य मित्र सुधाकर गंगातीरे, तसेच अधिकारी, महिला कर्मचारी, महिला नागरिक उपस्थीत होते.
