नांदेड(प्रतिनिधी)-जुन्या भांडणाच्या कारणातून गंजगाव ता.बिलोली या छोट्याशा गावात एका 32 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या दोघांना बिलोली पोलीसांनी पकडले आहे. बिलोली न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दत्तुराम गंगाराम ओनरवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 मे 2025 रोजी सकाळी 7 वाजेच्यासुमारास गौतम ज्ञानोबा घाटे (46) आणि मल्लीकार्जुन ओगलाजी ओनरवाड (25) दोघे रा.गंजगाव ता.बिलोली जि.नांदेड यांनी मारोती गंगाराम ओनरवाड (32) याचा जुन्या भांडणाच्या कारणातून डोक्यात काही तरी वस्तुने मारहाण करून गंभीर जखमी केले आणि मयताचा शर्ट फाडून त्याच्या गळ्याला आवळून त्याचा खून केला आहे. बिलोली पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 125/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कमल शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलीसांनी अत्यंत त्वरीत कार्यवाही करून खून करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. बिलोली न्यायालयाने आज त्यांना पोलीस कोठडीत पाठविले आहे.
गंजगाव ता.बिलोली येथे खून करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी
