नांदेड(प्रतिनिधी)-जुनी कॅसेट वाजवून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेड येथे झालेल्या सभेला संबोधीत केले. जुनी कॅसेट म्हणजे धर्म पुछ कर मारा. उध्दव सेनेवर ठिका करत मराठी भाषेला शास्त्रीय भाषेचा दर्जा मिळाला. असे सांगितले ही सुध्दा जुनीच कॅसेट आहे. खा.अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात बऱ्याच मागण्या सादर केल्या होत्या. त्यात नांदेड, हिंगोली आणि परभणी या तिन जिल्ह्याचा उल्लेख करून या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त गुणतवणूक यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याबद्दल सुध्दा गृहमंत्री अमित शाह काहीच बोलले नाहीत.

आज शंखनाद या कार्यक्रमात बोलतांना अमित शाह यांनी प्रथम दशम पातशाह श्री. गुरूगोविंदसिंघजी, माहुरगडाचे मालक दत्तात्रय, आई रेणुका, कोलंबी मठ, राहेरचे नृर्सिह भगवान, छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती संभाजी राजे, डॉ.भीमराव आंबेडकर यांना अभिवादन करून आपले बोलणे सुरू केले. ऑपरेश सिंदुरची कॅसेट वाजवली. मार्च 2026 पर्यंत देशाचा नक्षलवाद संपवणार असे सांगितले. सिंदु करार मोदींनी रद्द केला. पाकिस्तानची व्यापार दारे बंद केली हा सुध्दा जुनाच वक्तव्यांचा भाग आहे. संजय राऊत यांचे नाव न घेता उध्दव सेनेच्या नेत्याने असे सांगितले की, परदेशात पाठविलेले शिष्टमंडळ म्हणजे कोणाची वरात आहे. सम्राट अशोकांच्या काळापासून दुष्काळलेला मराठवाडा पाण्यासाठी परिपुर्ण व्हावा म्हणून सन 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा पावर ग्रिड कार्यक्रम हाती घेतला होता. तो आघाडी सरकारने बंद पाडला. आता तो पुन्हा सुरू करू. मराठी भाषेला नरेंद्र मोदी यांनी शास्त्रीय भाषेचा दर्जा दिला. संपुर्ण देशात सर्वप्रथम महाराष्ट्र विकसीत करू. त्यातूनच सन 2047 मध्ये विकसीत भारताची दारे उघडतील. खा.अशोक चव्हाण यांच्या कोणत्याही मागणीला अमित शाहच्या भाषणातून पाठींबा मिळाला नाही.
याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुध्दा ऑपरेश सिंदुरचे नाव घेत सैन्याला धन्यवाद दिले. जनतेने भारतीय जनता पार्टीला निवडणुकीत दिलेल्या यशासाठी धन्यवाद दिले. सध्या राज्यभरात सुरू असलेल्या पावसाची मला चिंता आहे असे सांगितले. जे प्रश्न विचारायाची हिम्मत पाकिस्तानमध्ये नाही ते प्रश्न खा.राहुल गांधी विचारतात असे सांगितले. आपण आजपर्यंत पीओके ऐकलात. म्हणजे पाक व्याप्त कश्मिर, आता पाकव्याप्त कॉंगे्रस झाली आहे असा उल्लेख केला. पुढच्या काळात जनतेला व्हाटसऍप संदेशावर त्यांची कामे करण्याची योजना आखत असल्याचे सांगितले. अत्यंत पारदर्शीपणे महाराष्ट्राची सरकार नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात चालवत आहोत असे सांगितले. 1 लाख कोटी खर्चाची नदी जोड प्रकल्पाची योजना हाती घेत आहोत. जालना-नांदेड हा समृध्दी महामार्ग पुर्ण करू असे सांगितले. पुढील काळात 7 हजार कोटींची गुंतवणूक शेतीत करणार आहोत. कारण आम्हाला शेतकरी सक्षम करायचा आहे असे म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना कणखर नेतृत्व, मजबुत व्यक्ती, इराद्याचे पक्के अशी विशेषणे लावून खा.अशोक चव्हाण यांनी सुरूवात केली. आजच्याच दिवशी 11 वर्षापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती असे सांगितले. पुर्ण नांदेड जिल्हा 100 टक्के भाजपमय करू असे सुध्दा सांगितले. नांदेड-परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात जास्तीत जास्त गुंतवणूक द्यावी असे सांगितले. देवाभाऊचा रोडमॅप विकासाचा असल्याचे सांगितले. जपानला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था आता चौथ्या क्रमांकावर आली आहे असा उल्लेख केला.
या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष अमित शाह यांच्या शब्दात भावी अध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांनी नवीन भारत जगाला दिसत असल्याचा उल्लेख केला. या कार्यक्रमात ना.पंकजा मुंडे, ना.मेघना बोर्डीकर, ना.चंद्रशेख बावनकुळे, ना.अतुल सावे, खा.अजित गोपछडे, खा.रावसाहेब दानवे, खा.भागवत कराड, राम पाटील रातोळीकर यांची व्यासपीठावर उपस्थितीत होती. या कार्यक्रमाचे आभार अमरनाथ राजूरकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमातच डी.पी.सावंत, बी.आर.कदम, डॉ.अंकुश देवसरकर, विश्र्वास कदम, शैलेश राखावार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला.
