पोलीस असल्याची बतावणी करून वृध्दाचा 1 लाख 50 हजारांचा ऐवज लांबवला

नांदेड(प्रतिनिधी)-दोन आरोपीनी पोलीस असल्याची बतावणी करून 69 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि हातातील सोन्याची अंगठी असा 22 ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज लांबवला आहे. 22 ग्रॅम सोन्याच्या वजनाची किंमत 1 लाख 50 हजार रुपये दाखविण्यात आली आहे.
भगवान नानाराव रावते हे 69 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्ती 24 मे रोजी दुपारी 2 वाजता शिव रस्त्यावर कांबळे यांच्या घरासमोरून जात असतांना आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करून त्यांच्या हातातील 7 ग्रॅम सोन्याची अंगठी आणि गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा 22 ग्रॅम सोन्याचा ऐवज काढून घेतला आहे. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 298/2025 नुसार नोंदवली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक नाईक अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!