भारतात माजी राज्यपालाविरुध्द पहिले दोषारोपपत्र दाखल

म्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलीक यांची 78 व्या वर्षात वाट लावण्याचा प्रकार सुरू झाला. त्यांच्याविरुध्द केंद्रीय अन्वेषण ब्युरो(सीबीआय) ने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या दोषारोपात 2 हजार 200 कोटीच्या कंत्राटामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. पुलवामा हल्ला झाला तेंव्हा सत्यपाल मल्लीकच राज्यपाल होते. त्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अनेक फोन लावल्यानंतर सुध्दा ते फोन आले नाही. कारण एका विदेशी कार्यक्रमासाठी कॉर्बेट नॅशनल पार्कमध्येच शुटिंग करत होते. त्यानंतर सत्यपाल मलीक यांनी विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांच्यासोबत बोलतांना सांगितले होते की, मी जेंव्हा पुलवामा हल्ला आपल्या चुकीमुळे झाला असे नरेंद्र मोदी यांना सांगितले तेंव्हा मला तोंड बंद ठेवण्याची सुचना केली होती. त्याच दिवशी हे ठरले होते की, सत्यपाल मलीकची वाट सरकार लावणार आहे आणि आता सीबीआयने दोषारोपपत्र दाखल केले म्हणजे ते बरोबरच आहे.


आपल्या विरुध्द सीबीआयने दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर सत्यपाल मलीक यांनी मी आजच्या परिस्थितीत दवाखान्यात उपचार घेत आहे आणि माझी परिस्थिती कोणालाही काही बोलण्यासारखी नाही असे ट्विट केले. सोबतच आपला दवाखान्यातील फोटो सुध्दा ट्विटला जोडला होता. ऑपरेशन सिंदूर नंतर बिहार निवडणुकांच्या व्यासपीठावरून नरेंद्र मोदी माझ्या शरिरातील धमन्यांमध्ये रक्त वाहत नसून त्यात गरम सिंदूर वाहत आहे असे बोलतात. शक्य आहे का वाचकांनो आणि काही भक्त यावर सुध्दा टाळ्या वाजवतात. पुलवामा हल्याला आता जवळपास 6 वर्ष झाली आहेत. त्या अतिरेक्यांचे काय झाले याचा काही एक थांगपत्ता नाही. तसेच पहलगाम हल्यातील अतिरेक्यांना जमीनीने खाऊन टाकले काय? त्यांचाही काही पत्ता लागला नाही. पण बिहार निवडणुकांच्या व्यासपीठावर नरेंद्र मोदी सांगतात मी सैन्याला सर्व प्रकारची सुट दिली होती. सैन्याने रचलेल्या चक्रव्युहात पाकिस्तान असा अडकला की त्याला गुडघ्ये टेकावे लागले. अशा पध्दतीने सैन्याच्या पराक्रमावर मतदान मागण्याचा कार्यक्रम सुरू आहे.


एकीकडे युध्द विराम, दुसरीकडे 11 दिवसात आठ वेळेस डोनॉल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, मीच भारत-पाकिस्तान युध्द विराम केले. यावर व्हाटसऍप युनिर्व्हसीटीने असा खेळ मांडला की, मोदीला विचारलेला प्रश्न हा भारत देशाचा प्रश्न व्हावा. पण तसे काही घडले नाही. एकीकडे खा.राहुल गांधी कडू प्रश्न विचारत आहेत. म्हणूनच सत्यपाल मलीकला टार्गेट करून पुन्हा जनतेचे लक्ष विकेंद्रीत करण्याचा हा प्रकार आहे काय? पुलवामा हल्ला झाला, 370 कलम रद्द करून जम्मू काश्मिरचे दोन भाग केले. या दोन्ही वेळेस सत्यपाल मलीक हे राज्यपाल होते. अर्थात ते संवैधानिक सरपंच होते. नरेंद्र मोदी यांच्याच शिफारशीवरून त्यांची नियुक्ती राज्यपाल या पदावर झाली होती. पण आता सत्यपाल मलीक सरकारला घोटाळेबाज वाटतात.


सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपाप्रमाणे जम्मू काश्मिरमधील किरु हायड्रो पॉवर योजनामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. ही योजना 2 हजार 200 कोटी रुपयंाची आहे. सीबीआयने 22 फेबु्रवारी 2024 रोजी सत्यपाल मलीकच्या अनेक ठिकाणांवर छापे मारले होते. त्या अगोदर सत्यपाल मलीक यांनी 17 सप्टेंबर 2021 रोजी असे सांगितले होते की, जम्मू काश्मिरचा राज्यपाल असतांना मला 300 कोटीची लाच घेण्याची ऑफर आली होती. पुढे एप्रिल 2022 मध्ये सीबीआयने जम्मू काश्मिर सरकारच्या सांगण्यावरून हे प्रकरण नोंदवले. 2018 ते 2019 या दरम्यान सत्यपाल मलीक हे जम्मू काश्मिरचे राज्यपाल होते. दोषारोप दाखल झाले तेंव्हा सत्यपाल मलीक हे दवाखान्यात उपचार घेत आहेत. आज त्यांचे वय 78 वर्ष आहे. त्यांनी स्वत: ट्विट केले की, मी बोलण्याच्या अवस्थेत नाही आणि आपला दवाखान्या पलंगावरील फोटो सुध्दा ट्विट केला आहे.
मागील वर्षीय सत्यपाल मलीकने सांगितले होते की, सीबीआयने माझ्या घरी छापे मारले. परंतू मी ज्यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. त्यांच्यावर काही कार्यवाही झालेली नाही. मी एक शेतकरी पुत्र आहे. मी राज्यपाल झालो तेंव्हा 5 कुर्ते पायजामे घेवून आलो होतो आणि तेवढेच घेवून परत जाणार आहे. पण प्रश्न हा आहे की, मोदी सरकारच्या चेहऱ्यावर घाम का येतो आहे आणि तो सुध्दा आता राज्यपाल नसलेल्या व्यक्तीमुळे म्हणजेच काही तरी रहस्य सत्यपाल मलीक यांच्याकडे आहेत असाच अर्थ निघतो.
17 ऑक्टोबर 2021 रोजी राजस्थानच्या झुनझुनूमध्ये बोलतांना सत्यपाल मलीक जाहीरपणे म्हणाले होते की, ते राज्यपाल असतांना माझ्याकडे करोडो रुपयांच्या लाचेची ऑफर आली होती. परंतू मी ती स्विकारली नाही. त्यावेळेस दोन संचिका आल्या होत्या. त्यात एक मोठ्या उद्योगपतीची होती आणि दुसरी संचिका जम्मू काश्मिरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महेबुबा मुफ्ती यांच्या डबल इंजिन सरकारमध्ये मंत्री असलेल्या व्यक्ती होती. त्यांच्या सचिवाने त्यांना सांगितले की, या संचिकांमध्ये घोटाळा आहे. म्हणून मी त्या रद्द केल्या. या दोन संचिकांसाठी प्रत्येकी 150 कोटी रुपये अर्थात 300 कोटी रुपये देण्याचे ऑफर आली होती. सीबीआय मला विचारेल तेंव्हा मी दोघांची नावे सांगेल. पण सीबीआयने त्यांना विचारले काय? आणि विचारले तर मलीक यांनी सांगितले काय? या प्रश्नांची उत्तरे तर उपलब्ध नाहीत. पण सीबीआयने दोन पोलीस प्राथमिकी दाखल केल्या त्यात 2017-2018 मध्ये जम्मू काश्मिर कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा ठेका जो 60 कोटी रुपयांचा होता. तो देण्यासाठी लाच घेतली. दुसरा एफआयआरप्रमाणे 2019 मध्ये किरु हायड्रोपॉवर योजनेतील बांधकामाचे कंत्राट एका खाजगी कंपनीला देण्यासाठी भ्रष्टाचार झाला आहे. त्या योजनेची किंमत 2 हजार 200 कोटी रुपये आहे.
वाचकांनो वेळापत्रकावर लक्ष द्या. एकीकडे अचानक युध्दविराम, दुसरीकडे मोदींची परिस्थिती वाईट झाली. त्यावर डोनॉल्ड ट्रम्प नेहमी असे बोलत आहेत की, जसे काही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिष्ठेची सुपारी घेतली आहे. एकीकडे ट्रम्प सांगतात नरेंद्र मोदी आणि शाहबाज शरिफ हे दोन्ही माझ्यासाठी एकसारखेच आहेत. तसेच पाकिस्तान हा देश महान असल्याचे सांगतात. म्हणून मोदीला विश्र्व गुरू म्हणणाऱ्यांचे टाके तुटले असतील.
खा.राहुल गांधी यांनी आपल्या एका ट्विटमध्ये आतंकवाद संबंधाने पाकिस्तानच्या बोलण्यावर विश्र्वास का केला. ट्रम्पसमोर गुडघे टेकून आपण भारताच्या हितांचा बळी का दिला. आपले रक्त फक्त कॅमेऱ्यांसमोरच का गरम होत असते असे तिन प्रश्न आहेत. सोबतच त्यांनी वाक्य लिहिले आहे की, आपण भारताच्या सम्मानाशी तडजोड केली आहे. या प्रश्नांची उत्तरे पण उपलब्ध नाहीत. कोणीच या प्रश्नांची उत्तरे देत नाही. अशा पध्दतीची लोकशाही भारतात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!