19 वर्षीय युवकचा खून करणारा एक युवक व दोन अल्पवयीन बालक पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-19 वर्षीय युवकाचा खून करणाऱ्या एका गुन्हेगाराला विमानतळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तरित्या गजाआड केले आहे.
दि.20 मे रोजी ग्यानमाता शाळेजवळ प्रविण पवार या 19 वर्षीय युवकाचा खून झाला होता. या संदर्भाने विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 200/2025 दाखल होता. याचा माग काढतांना विमानतळचे पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, विमानतळचे पोलीस उपनिरिक्षक विनोद साने, गोविंद जाधव, दत्ता वाणी आणि कल्याणकर यांनी पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, शेख जावेद, किशन चिंतोरे, वैजनाथ कानगुले, जुबेर चाऊस, रितेश कुलथे, राजेश माने, शेख शोयब, दिगंबर डोईफोडे, संतोष राणे, साई सोनसळे, भारत गुरुपवार, नागनाथ स्वामी यांनी मेहनत घेवून वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकरणातील आरोपी अजय उर्फ ओम्या जळबा सुर्यवंशी (21) रा.शिखाचीवाडी ता.मुदखेड यास 24 तासात पकडले. सोबतच ओम्या सुर्यवंशीला मदत करणारे दोन अल्पवयीन बालक सुध्दा पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. पकडलेल्या ओम्या सुर्यवंशीला न्यायालयाने 26 मे 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!