नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय पोलीस सेवेतील 21 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश गृहमंत्र्यालयाने जारी केले आहेत. त्यात लातूरचे पोलीस अधिक्षक, आहिल्यानगरचे पोलीस अधिक्षक, रायगडचे पोलीस अधिक्षक, कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक आणि नांदेड येथील नागरीक हक्क संरक्षणचे पोलीस अधिक्षक यांचा समावेश आहे. मागे नांदेडमध्ये सहाय्यक पोलीस अधिक्षक असलेले अर्चित चांडक यांना पोलीस अधिक्षक अकोला या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. राज्य शासनाच्या गृहविभागाने आज जारी केलेल्या शासन निर्णयानुसार 21 भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. या आदेशावर गृहविभागाचे सचिव व्यंकटेश भट यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिलेली आहे. राकेश ओला-पोलीस अधिक्षक अहिल्यानगर(पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), सोमनाथ घार्गे -पोलीस अधिक्षक रायगड(पोलीस अधिक्षक अहिल्यानगर), आंचल दलाल-समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक-1 पुणे (पोलीस अधिक्षक रायगड), महेंद्र पंडीत-पोलीस अधिक्षक कोल्हापूर(पोलीस उपआयुक्त ठाणे शहर), योगेशकुमार गुप्ता-पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण नांदेड(पोलीस अधिक्षक कोल्हापूर), बच्चनसिंह- पोलीस अधिक्षक अकोला(समादेशक राज्य राखीव बल गट क्रमांक 4 नागपूर), अर्चित चांडक-पोलीस उपआयुक्त नागपूर शहर(पोलीस अधिक्षक अकोला), मंगेश शिंदे-पोलीस उपआयुक्त विशेष कृती दल आर्थिक गुन्हे बृहन्मुंबई(पोलीस अधिक्षक लोहमार्ग नागपूर), राजतिलक रोशन-सहाय्यक प ोलीस महानिरिक्षक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य मुंबई (पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), बाळासाहेब पाटील-पोलीस अधिक्षक पालघर(पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण), यतीश देशमुख-अपर पोलीस अधिक्षक अभियान गडचिरोली(पोलीस अधिक्षक पालघर), सौरभ अग्रवाल-पोलीस अधिक्षक सिंधदुर्ग(पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे), विश्र्व पानसरे-पोलीस अधिक्षक बुलढाणा(समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमंाक 9 अमरावती), निलेश तांबे-पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर(पोलीस अधिक्षक बुलढाणा), समीर असलम शेख-पोलीस अधिक्षक सातारा(पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), तुषार दोषी-पोलीस अधिक्षक लोहमार्ग पुणे(पोलीस अधिक्षक सातारा), सोमय विनायक मुंडे-पोलीस अधिक्षक लातूर(पोलीस उपआयुक्त परिमंडळ-1 छत्रपती संभाजीनगर), जयंत मिना-पोलीस अधिक्षक दहशतवाद विरोधी पथक पुणे, (पोलीस अधिक्षक लातूर), नितीन बगाटे-पोलीस उपआयुक्त छत्रपती संभाजीनगर(पोलीस अधिक्षक रत्नागिरी), रितू खोकर-अपर पोलीस अधिक्षक सांगली(पोलीस अधिक्षक धाराशिव). Kanthak Suryatal Post Views: 1,369 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तब्बल 30 वर्षांनी जमले एकत्र मित्र, दिला जूण्या आठवणींना उजाळा 19 वर्षीय युवकचा खून करणारा एक युवक व दोन अल्पवयीन बालक पकडले