नांदेड, – नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असुन यात शहरापासून जवळच असलेल्या मरळक फाटा येथील गोदावरी प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालय व इंटरनॅशनल स्कूलने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या निमित्ताने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संचालक प्रा. कैलास पौळ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
गोदावरी प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी कृष्णा पवार ९६ टक्के गूण घेऊन प्रथम तर राजनंदनी कराळे ९४ टक्के, कोमल चव्हाण ९४ टक्के गूण घेऊन द्वितीय आली आहे. तर कृष्णा एडके, सुप्रिया सूर्यवंशी, पवन जाधव हे ९३ टक्के घेऊन तृतीय आले आहेत. या विद्यार्थ्यांबरोबरच शाळेतील अमोल पवार ९२ टक्के, श्रेयस वाके ९० टक्के, सर्वज्ञ बुक्तरे, शिवानी इंगोले, शिवम माखले, प्रतीक नेवरकर, दर्शन मुंडे हे ८९ टक्के, गोविंद मोरे हा ८८ टक्के गूण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे गोदावरी इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजची सिबीएसई माध्यमातून विद्यार्थिनी कांचन पुपलवाड ९५ टक्के गूण घेऊन शाळेतून प्रथम आली आहे. ध्रुप अरविंद राठोड ८७ टक्के घेऊन तर श्रीकांत पुष्पक भिसे हा ८६.२० टक्के घेऊन शाळेतून तृतीय आला आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेचे संचालक प्रा. कैलास पौळ यांनी अभिनंदन करून सत्कार केला. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुक्ताताई पौळ, संकेत व संजीवनी हॉस्टेलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. पाटील, प्रमुख अतिथी म्हणून संगीता भिसे, संतोष पौळ, परमेश्वर पौळ यांची उपस्थिती होती. तसेच शाळेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शंकर होपळे, गोदावरी प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैजयंती कस्तुरे, गोदावरी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य नितीन हटकर, शाळेचे सह समन्वयक डी. जी. पाटील, शाळेच्या अधिक्षिका संध्या वडजे, दोन्ही शाळेचे पर्यवेक्षक नितीन बिरादार, प्रल्हाद शिंदे, सहशिक्षिका मिनाबाई सूर्यवंशी यांच्यासह इयत्ता दहावी उन्हाळी वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
