पणजी-दिनांक 17 मे रोजी पणजी फर्न कदंबा हॉटेल येथे देशातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा चित्रपट अभिनेते व प्रसिद्ध उद्योजक यांचं हस्ते शाल, ट्रॉफी, गौरव पत्र,मेडल व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंग्लंड या संस्थेची स्मरणिका देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. विठ्ठल जाधव व सौ.विद्याताई जाधव संस्थापक अध्यक्षा शांतीदूत परिवार यांचा अभिनेते करण मेहरा, संस्थेचे अध्यक्ष मनीषकुमार, उपाध्यक्ष डॉ. दीपक हारके यांच्या शुभ हस्ते ग्लोबल एक्सेलनस पुरस्कार प्रदान करुन सत्कार करण्यात आला.या वेळी प्रसिद्ध अभिनेत्री हिमानी शिवपुरी, अभिनेते सचिन पारीख, हितेश भारद्वाज, निखिलेश राठोड, अक्षदा मुदगल, रुपाली शर्मा, सुशील पराशर, भारताचे ढोलकी किंग बंधू हनीफ, अस्लम जी, प्रसिद्ध पत्रकार अमित त्यागी व देशातील विविध भागातील पुरस्कारर्थी व शांतीदूत परिवार पुणे अध्यक्षा रोहिनी कोळेकर , मधू चौधरी, शीतल चौधरी उपस्थित होते. शांतीदूत परिवार पदाधिकारी, सदस्य हितचिंतक, अधिकारी व मित्र परिवारासह अनेकांनी डॉ. विठ्ठल जाधव , सौ. विद्या जाधव व शांतीदूत परिवाराचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

