नांदेड(प्रतिनिधी)-फायनान्स कंपनीचे पैसे जमा करून घेवून जाणाऱ्या दोन जणांना अर्जापुर ते बिलोली रस्त्यावर सुलतानपुर जवळ लुटण्यात आले आहे.
भारत फायनान्स बिलोलीचे व्यवस्थापक माधव हनमंत घोरपडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 मे रोजी रात्री 9.15 वाजता ते आणि त्यांचे मित्र प्रमोद शिवराळे असे फायनान्स कंपनीचे पैसे जमा करून परत बिलोलीकडे जात असतांना सुलतानपुरजवळ दोन अज्ञात गुन्हेगारांनी त्यांच्या डोळ्या मिर्चीची पुड टाकून त्यांच्याकडे असलेली 60 हजार रुपये रोख रक्कमेची बॅग आणि सॅमसंग कंपनीचा 6 हजार रुपये किंमतीचा टॅब आणि बायोमॅट्रीक 600 रुपयांचे असा एकूण 66 हजार 600 रुपयंाचा ऐवज लुटून नेला आहे. लुटारी लाल रंगाच्या बजाज प्लसरवर आले होते. ते कुंडलवाडीकडे निघून गेले आहेत. कुंडलवाडी पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 96/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक गजेंद्र मांजरमकर हे करीत आहेत.
फायनान्स कंपनीचे पैसे लुटले
