नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत पदवी व पदव्युत्तर उन्हाळी-२०२५ नियमित परीक्षा सुरु आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांना दूरशिक्षण, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे परीक्षा देता आलेल्या नाहीत. अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा दि. २१ मे पासून विद्यापीठाने ठरवून दिलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत.
विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२५ नियमित परीक्षा सुरु आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांना दूरशिक्षण, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे परीक्षा देता आलेल्या नाहीत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी दि. ५ मे पर्यंत एमकेसीएल च्या ऑनलाईन पोर्टलवर परीक्षा आवेदन पत्र भरलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांची परीक्षा दि. २१ मे पासून घेण्यात येणार आहेत. या अतिरिक्त पदवी परीक्षेचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशित महाविद्यालातून घ्यावे आणि पदव्युत्तर परीक्षेचे प्रवेशपत्र एमकेसीएल च्या ऑनलाईन पोर्टलवर व विद्यार्थ्यांच्या मोबाईल अॅप मध्ये देण्यात येणार आहे.
या परीक्षेसंबंधीत सर्व विद्यार्थ्यांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी केले आहे.
