नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस अंमलदारांना काही जणांनी मारहाण करून जखमी केले आहे. यासंदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शेख आसिफ अली अजगर अली हे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार 13 मेच्या रात्री ते 14 मे पहाटेपर्यंत नाईट डयुटीवर असताना त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार जमीन अहेमद हे त्यांच्या पोलीस ठाण्यातील दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना खाजगी वाहनाने गस्त करत असताना रात्री 11.30 वाजेच्या सुमारास पद्मा बार समोर चार लोक आपसात मारहाण करताना दिसले. पोलीस असल्याने या दोघांनी थांबवून त्यांनी विचारणा केली. त्यातील दोन भावांना ते ओळखत होते. त्याची नावे करण आनंदराव तारू (26) आणि अरविंद आनंदराव तारू (30) दोघे रा. वाजेगावचे आहेत. आम्ही भांडण सोडवत असताना पोलीस असल्याचे आम्हाला ओळखणारी पैकी चार-पाच लोक तेथे आले आणि आम्हाला भांडण सोडविण्यास मदत करत होते. तेव्हा दोन जण तेथून पळून गेले. परंतु अरविंद आणि करण तारूने आमच्या भागात फिरू नका असे आम्हालाच उलट सांगितले आणि त्याच्या हातातील कड्याने मला मारून जखमी केले. माझा सहकारी पोलीस अंमलदार जमीर अहेमद यालाही सुद्धा मारहाण केली. यासंदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 459/2025 दाखल करण्यात आला आहे. पोलीस असल्याचे माहित असताना सुद्धा हल्लेखोरांनी यांच्यावर हल्ला केला आहे, म्हणून सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय हा प्रश्न आ वासून उभा आहे.
