कर्नल सोफिया कुरेशी अतिरेक्यांच्या बहिण -इतिश्री ना. विजय शाह

भारताच्या थलसेनेतील कर्नल सोफिया कुरेशी यांनी तीन दिवसांच्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला की नाही हे फक्त सैन्य विभागाला आणि त्यांनाच माहित आहे. परंतु भारतीय सैन्याचा चेहरा बनवून विदेश मंत्री विक्रम मिसीर, लेफ्टनंट व्योमीका सिंह यांच्यासह भारतीय सैन्याने काय कारवाई केली जरूर प्रसारित केली. भारतीय जनता पार्टीच्या मध्यप्रदेश राज्यातील एक मंत्र्याने मात्र सोफिया कुरेशीला अतिरेक्याची बहिण म्हटले. त्यांचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर माफी पण मागितली. आमचा वाचकांसमोर असा प्रश्न आहे की, आम्ही त्या मंत्र्यांना शिवी दिली असती आणि नंतर माफी मागितली असती तर आमचे काय हाल झाले असते.

सोफिया कुरेशी यांनी भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीचे सविस्तर वर्णन प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर तो संदेश देशासाठी प्रसारित केला. सोफिया कुरेशी ह्या तीस वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. आज त्यांचे पद मोठे उच्च आहे. सेवा करताना त्यांनी आपल्या पदासाठी आणि आपल्या सेवेच्या कालखंडासाठी न्यायालयीन लढाई सुद्धा त्या जिंकल्या आहेत. त्यांनी देशाच्या सैन्यात तीस वर्षे सेवा केली, याचे भान तरी बोलताना असायला हवे होते. मध्यप्रदेश राज्यातील भाजप सरकारमध्ये मंत्री असलेल्या विजय शाह यांनी ऑपरेशन सिंदूरचे गोडवे गाताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शब्दांचे पुष्पहार अर्पण करताना सांगितलेले शब्द ऐवढे घाणेरडे आहेत की, ते लिहून आम्ही आमची पत गमावू इच्छित नाही. परंतु एक वाक्य जरूर लिहू विजय शाह यांनी सांगितले, आमच्या नागरिकांना मारणाऱ्या लोकांची वाट लावण्यासाठी त्यांची बहिण सोफिया कुरेशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठविली. अर्थात सोफिया कुरेशी विजय शाह यांच्या बोलण्याप्रमाणे अतिरेक्यांच्या बहिण झाल्या.

 

यानंतर त्यांचा व्हिडीओ सर्वत्र वायरल झाला. देश कोण झुकने नहीं देंगे, देश सवाल पुछ रहा है.. असे कार्यक्रम करून त्यात वादविवाद घडवणाऱ्या गोदी मीडियाने मात्र विजय शाह यांच्या शब्दांवर कोणतेही वादविवाद घडविले नाही. तसेच त्यांच्या व्हिडीओवर सुद्धा चर्चा केली नाही. त्या व्हिडीओमध्ये सोफिया कुरेशीची चर्चा आहे. सोफिया कुरेशी ह्या महिला आहेत, देशाच्या सैन्य दलात उच्चपदस्थ अधिकारी आहेत. नाहीतर त्या गोदी मीडियाला नेहा राठोड आणि डॉ. मेडूसा ह्यांनी काय चुक केले हे दाखवायला वेळ आहे, पण सोफिया कुरेशीची बेअब्रू करणाऱ्या विजय शाहवर बोलायला वेळ नाही. कॉंग्रेसचे खासदार इमरान प्रतापगडी यासंदर्भाने म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्याचा उत्साह वाढविण्यासाठी युद्धविराम झाल्याबरोबर आदमपूर छावणीत जातात आणि त्यांच्याच पक्षाचा मंत्री मध्यप्रदेशमध्ये ज्या भाषेत सोफिया कुरेशीबद्दल बोलत आहेत, ती भाषा जातीयवादी आहे. मी पंतप्रधानांना विनंती करतो की, तुमच्या सैन्याचा सन्मान देशाला दाखवायचा असेल तर तुमच्या मंत्र्याना पदावरून हटवा आणि त्याच्याविरूद्ध कारवाई करा. आणि जर त्यांनी कारवाई केली नाही तर भाजपसाठी ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे.

आपल्या बोलण्याचा विर्पयास्थ झाल्याची घटना विजय शाहपर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी एएनआयसमोर दिलेल्या मुलाखतील ते सांगत होते की, सोफिया कुरेशी ह्या माझ्यासाठी मोठ्या बहिण आहेत. जाती समाजाच्या वर जाऊन सोफिया कुरेशी यांनी काम केले आहे. माझा उद्देश वाईट नाही, तरी कोणाच्या मनाला माझ्या बोलण्याने धक्का लागला असेल तर मी एकदा नाही दहावेळेत जाहीर माफी मागतो आणि मी देशप्रेमी आहे, हे सांगू इच्छितो. आमचा वाचकांसमोर प्रश्न असा आहे की, विजय शाह प्रमाणे आम्ही सुद्धा विजय शाह शिवी दिली, त्यांची बेअब्रू केली आणि नंतर माफी मागितली तर आमचे काय हाल करण्यात आले असते, याचा विचार करूनच अंगावर काटे येत आहेत. कोठे चालला आहे देश वाचकांनीच ठरवायला हवे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!