नांदेड :- विश्वातील सर्वोत्तम राजपुत्र युवराज छत्रपती संभाजी महाराज यांची 368 वी जयंती देशाची राजधानी दिल्ली येथे छावा नाराठा संघटना व अखिल भारतीय छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती आणि सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त सहकार्याने 14 मे 2025 रोजी साजरी होत आहे. या जयंती महोत्सवाला नांदेड जिल्ह्यातील छावा मराठा संघटनेचे पदाधिकारी आणि शंभूप्रेमी रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाले आहेत. राष्ट्रीय स्तरावर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरा करण्यात येणारे यावर्षी तिसरे वर्ष आहे. यासाठी इंजि.तानाजी हुस्सेकर, डॉ.अशोक कदम, डॉ. अविनाश पुयड,डॉ. प्रभाकर जाधव, प्रा. सुधाकर कौशल्य, इंजि. प्रवीण जाधव, अजय मुंगल, प्रवीण पाटील,सतीश पवार, खुशाल जाधव,श्याम जाधव, दीपक राजूरकर शिवेंद्र राजूरकर, शिवानंद पाटील, गोपीराज हंबर्डे, प्रमोद देशमुख यसह बहुसंख्य शंभूप्रेमी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्यांना ढोल ताशाच्या गजरात निरोप देण्यासाठी अशीष चौधरी, प्रकाश गिरे पाटील, संदीप कऱ्हाळे, नागेश कल्याणकर, दीपक पावडे, सतीश देशमुख, प्रशांत तिडके, विजय जाधव, पंडित पवळे, संजय हंबर्डे, श्रीकांत मगर, श्रीराम चक्रवार, केदार उपाध्याय, महेश ठाकूर, शुभम धनजकर गोपीनाथ हुस्सेकर प्रा. अर्जुन सूर्यवंशी, श्रवण हुस्सेकर, पंडित पवळे, गणेश वडजे, शिवाजी पाटील, विजय जाधव सुरेश इंगळे, भास्कर थेटे, श्रीहरी गुरुजी कौशल्ये, प्रथमेश कदम,कृष्णा जाधव जिजाऊ ब्रिगेडच्या महिला उपाध्यक्ष रेणुका कौशल्य, सविता जाधव, सदिच्छा पाटील सोनी यसह अनेक महिला व पुरुष शिवप्रेमी यांनी सर्वांचे उत्साहात ढोल ताशाच्या गजरात स्वागत करून निरोप दिले.
छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जन्मोत्सव याकरिता शंभुप्रेमी दिल्लीकडे रवाना….
