नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अँड कल्चर मुव्हमेंट च्या वतीने पत्रकार राम यांना धम्मारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . बुद्ध पहाट निमित्त आज पहाटे सहा वाजता महात्मा फुले पुतळ्यासमोर आयोजित करण्यात आलेल्या संगीतमय कार्यक्रमात आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अँड कल्चर मुव्हमेंट च्या वतीने गेले 17 वर्षापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा बुद्ध पहाट या कार्यक्रमात धमरत्न पुरस्काराने गौरव करण्यात येतो. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल यावर्षीचा धम्मरत्न पुरस्कार पत्रकार राम तरटे यांना जाहीर करण्यात आला होता . आज पहाटे सहा वाजता महात्मा फुले पुतळ्यासमोर पार पडलेल्या बुद्ध पहाट या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तरटे यांना धमरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला . आ. बालाजीराव कल्याणकर , संयोजक प्रमोद गजभारे , मंगेश कदम , राहुल चिखलीकर , प्रभू सावंत , अशोक कांबळे, भगवान गायकवाड, दयानंद गायकवाड, सत्यपाल नरवाडे , बंटी लांडगे आदींची यावेळी उपस्थिती होती. Kanthak Suryatal Post Views: 945 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation श्रेयस यांचं “मेरी दुनिया तू” हे हिंदी गाणं प्रदर्शित ; प्रेम आणि त्यागाची सैनिकाची चीअमर प्रेमकहाणी! महाराष्ट्र प्रांतीय खांडल समाज के महत्वपूर्ण संस्थानों का संकलनकर्ता श्री गिरधारी लाल जी शर्मा (माटोलिया)