नांदेड,(प्रतिनिधी)-शहरातील मटका जुगाराचे अड्डे सुरू आहेत. त्याचा पुरावा आज व्हिडिओ द्वारे प्राप्त झाला आहे.
पत्रकारिता करताना अनेकदा बातम्या सूत्रांच्या आधारावर असतात आणि सूत्रांची नावे कधी सांगता येत नसतात. ती नावे सांगितली तर पत्रकारांची सूत्रे समाप्त होतील याची भीती असते. फण काही अधिकार्यांना ती पत्रकारिता येल्लो जर्नरलिझम वाटते. आज प्राप्त झालेल्या या व्हिडिओमध्ये मटका जुगारचा अड्डा सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. सर्व काही बंद आहे अशी फक्त चर्चा करून काय फायदा. सर्वकाही सुरूच आहे पण सांगितले जाते की बंद आहे.
तीन पोलिसांना नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या मालकाकडे सेवा देण्यासाठी माहूर येथे पाठवण्यात आले आहे. त्यातीव एक जण आजही नांदेड जिल्ह्यातील वसुली अधिकारी आहेच. कोणासाठी करत आहे तो वसुली याबाबत स्पष्टता समजली नाही.इतर दोघांबद्दल माहिती प्राप्त झालेली नाही.असा सुरू आहे हा जुगार अड्डा इतवारा भागातील सब्जी मंडी मध्ये.
संबंधित व्हिडिओ…
