नांदेड (प्रतिनिधी)- कुंटूर पोलिसांनी 6 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या चोरी प्रकरणात 52 हजारांचा मुद्देमाल जप्त करून एका चोरट्याला अटक केली आहे.
दि. 6 डिसेंबर 2024 रोजी सावरखेड ता. नायगाव येथील माधव पांडूरंग वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या भावकीतील मारोती दिगंबर वाघमारे याने त्यांच्या घराच्या छतावर चढून घरामध्ये येऊन सोन्या-चांदीचे वेगवेगळे दागिने, मोबाईल असा एकूण 73 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून पळ काढला होता. यासंदर्भाने कुंटूर पोलीस ठाण्यात 271/2024 दाखल होता. पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी, कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक रामकृष्ण पाटील यांच्यासोबत पोलीस अंमलदार रामचंद्र पवार, निळकंठ निमलवार यांनी मारोती दिगंबर वाघमारेला पुणे येथून अटक केल्यानंतर त्याने 10 ग्रॅम सोन्याचे पोत 50 हजारांची आणि 2 हजार रूपये किंमतीची चांदीचे जोडवे असा ऐवज काढूून दिला आहे.
