धर्माबाद पोलिसांनी लाल वाळूची गाडी पकडली

नांदेड (प्रतिनिधी)- धर्माबाद पोलिसांनी रात्रीची गस्त करत असताना सायखेड फाटा या ठिकाणी एका हायवा गाडीची तपासणी केली त्यात बेकायदा चोरटी वाळू भरलेली होती. गाडीसह धर्माबाद पोलिसांनी 30 लाख 15 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक प्रियंका पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 मे रोजी रात्री गस्त करत असताना सायखेड फाट्याजवळ हायवा गाडी क्र. एम.एच. 26 सी.एच.ची तपासणी केली. यामध्ये चोरट्या पद्धतीने आणलेली लाल वाळू भरलेली होती. 15 हजार रूपयांची वाळू आणि 30 लाख रूपयांची हायवा असा 30 लाख 15 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी, धर्माबाद पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रियंका पवार, सोमनाथ मठपती, अरूण कदम, सतिश तलवारे, प्रथमेश दाभाडे यांनी ही कारवाई केली. दाखल करण्यात आलेल्या गुन्हा क्र. 124/2025 मध्ये गाडीचालक सदाशिव पिराजी निंबाळकर रा. उमरी आणि उमरी गावचे रियाज बेग गफार बेग या दोघांना आरोपी करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!