नांदेड(प्रतिनिधी)- वडापाव खाताना भांडण करून एका 33 वर्षीय व्यक्तीचा खून पेठवडज प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर काल दि. 10 मे रोजी दुपारी घडला आहे.
अंजनाबाई सुरेश डावखोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. 10 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा धोंडीबा सुरेश डावखोरे वय 33 हा पेठवडज ता. कंधार येथील आरोग्य केंद्रासमोर वडापाव खात असताना पेठवडज गावातील बाळू मुखेडे, चंद्रकांत म्हेत्रे, परमेश्वर फुले आणि धोंडीबा म्हेत्रे यांनी त्याच्यासोबत भांडण उकरले. या चौघांनी मिळून धोंेडीबा डावखोरेला लाथा-बुक्यांनी छातीवर, तोंडावर मारहाण करून डोक्यात दगड मारून त्याचा खून केला आहे. कंधार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र. 140/2025 दाखल केला आहे. याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे करीत आहेत. या प्रकरणातील दोन मारेकरी कंधार पोलिसांच्या ताब्यात आहेत.
पेठवडजमध्ये चार जणांनी केला एकाचा खून
