मुदखेड :- तालुक्यातील मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज दि. 10 मे रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास वैद्यकिय अधिकारी यांच्या निवास्थान परिसराच्या बागे मध्ये अचानक आग लागली. या बागे मध्ये विविध प्रकारची झाडे लावण्यात आली होती. आज अचानक आग लागल्याने विविध प्रकारची आयुर्वेदिक झाडे जळाली आग विझवण्यासाठी वैद्यकिय अधिकारी डॉ झिकरे मॅडम, सुपरवायझर प्रदीप राठोड, आरोग्य सेविका हिंगोले ताई, आरोग्य कर्मचारी शिवाजी शिंदे, केसरबाई, तोडे सिस्टर, परिचर राठोड ताई यांनी परिश्रम घेऊन आग विझवली.
संबंधित व्हिडिओ
