नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय पोलीस सेवेतील दोन अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक श्रेणीत पदोन्नती देवून नवीन पदस्थापना देण्यात आली आहे. तसेच इतर अपर पोलीस महासंचालक पदातील अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. सध्याचा महिना मे आहे. हा महिना बदल्यांचे वारे वाहणारा असतो.
पोलीस महासंचालक या श्रेणीत पदोन्नती देवून संचालक नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई येथील प्रभातकुमार यांना त्या कार्यालयाचे पद उन्नत करून नियुक्ती मिळाली आहे. गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांना पोलीस महासंचालक लोहमार्ग मुंबई हे पद उन्नत करून नियुक्ती देण्यात आली आहे.
अपर पोलीस महासंचालक(नियोजन व समन्वय) सुनिल रामानंद यांना अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे नियुक्ती देण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके येथील राजकुमार व्हटकर यांना अपर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बलगट मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) के.एम.मल्लीकार्जुन प्रसन्ना यांना अपर पोलीस महासंचालक(प्रशिक्षण व खास पथके मुंबई) येथे नियुक्ती मिळाली आहे. अपर पोलीस महासंचालक महामार्ग मुंबई प्रविण साळुंके यांना अपर पोलीस महासंचालक महामार्ग सुरक्षा महाराष्ट्र राज्य मुंबई या पदावर नियुक्ती मिळाली आहे. हे आदेश गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहेत.

