नांदेड(प्रतिनिधी)-फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीचे युवा नेते, नेहमीच सामाजिक आणि धार्मीक कार्यात निस्वार्थपणे पुढाकार घेणारे युवा नेते बंटीभाऊ लांडगे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल अॅन्ड कल्चरल मुव्हमेंट च्यावतीने दिल्या जाणारा 2025 चा धम्मरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल अॅन्ड कल्चरल मुव्हमेंट च्यावतीने दिल्या जाणार्या धम्मरत्न पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा बुध्द पहाट कार्यक्रमाचे संयोजक प्रमोद गजभारे यांनी आंबेडकरी चळवळीचे युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांना यावर्षीचा धम्मरत्न पुरस्कार जाहिर केला आहे. धम्मकार्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविले जाते. दि.12 मे रोजी शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात आयोजित बुध्द पहाट या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार दिल्या जाणार आहे अशी माहिती आयोजक गजभारे यांनी दिली. युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांना त्यांच्या कार्याची दखल घेवून यापुर्वीही अनेक सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे याबद्दल त्यांना त्यांच्या मित्रपरिवारातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
