हाफिज सईद, अजहर मसुद, सय्यद सलाउद्दीन या तिघांना संपविल्याशिवाय अतिरेकी उत्पादन कारखाने बंद होणे अशक्य

भारतीय सैन्याच्या तिन्ही विभागाने संयुक्तरित्या केलेल्या कार्यवाहीत पाकिस्तानमध्ये अतिरेकी तयार करणारे 9 कारखाने उध्वस्त करण्यात आले. पण अतिरेकी उत्पादन करणारे तीन मोहरके मात्र पाकिस्तानने 22 एप्रिलपासूनच सुरक्षीत ठेवले होते.त्यामुळे ते वाचले आहेत. जोपर्यंत ते 3 संपणार नाहीत. तोपर्यंत अतिरेकी उत्पादनाचे कारखाने पुन्हा सुरू होतीलच. पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांनी, आयएसआय अधिकारी, पाकिस्तान सैन्याचे अधिकारी काल तेथे झालेल्या 14 लोकांच्या अंतिमक्रियेत सहभागी झाले होते आणि त्या अतिरेक्यांनाच ते आमचे नागरीक म्हणत आहेत. उद्या 9 मे रोजी त्यांना आयएमएफ कडून अब्जावधी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यानंतर त्यांचा विचार काही वेगळा असेल असे दिसते. गोदी मिडीया मात्र पाकिस्तानमध्ये घुसून भारताने सत्यानाश केल्याच्या बातम्या देत आहे. एकीकडे सांगितले जाते अफवांवर विश्र्वास ठेवू नका आणि दुसरीकडे अशा बातम्या देवून सैन्याने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीच्याविरोधात बातम्या दिल्या जात आहेत. जनतेने स्पष्ट, पारदर्शक बातम्या देणाऱ्यांवरच विश्र्वास ठेवावा.


25 मिनिटात भारतीय विमानांनी हवेतून जमीनीवर मार करणाऱ्या हॅमर मिसाईलद्वारे पाकिस्तानच्या वायुसिमेत न जाता हल्ले केले. त्यात मौलाना अजहर मसुदच्या जैस ए मोहम्मद या संघटनेच्या चार ठिकाणांवर हल्ला केला, हाफिज सईदच्या लष्कर ए तैयबा या संघटनेच्या तीन ठिकाणांवर हल्ला केला आणि सय्यद सलाउद्दीनच्या हिजबुल मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेच्या दोन ठिकाणांवर हल्ला केला. हा हल्ला झाल्याबरोबर एका तासात गोदी मिडीयाने कोणी 90 तर कोणी 700 अतिरेकी मारले गेल्याची अफवा पसरवली. पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचा सत्यानाश केल्याचे सांगितले गेले. परंतू 7 रोजी सकाळी 10.30 वाजता भारतीय सैन्य दलाच्यावतीने सुरक्षा सचिव विक्रम मिसीर, भारतीय थलसेनेतील कर्नल सोफीया कुरेशी आणि हवाई दलातील विंग कमांडर व्योमिकासिंह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वापरलेले मोजकेच शब्द होते. त्यांनी सांगितले होते. आमच्या विमानांनी पाकिस्तानच्या वायुसिमेत प्रवेशच केला नाही. आमची कार्यवाही अत्यंत मोजून मापुन होती, आम्ही कोणत्याच पाकिस्तानी नागरीकांवर, दवाखान्यांवर, शाळांवर हल्ला केला नाही. ज्या ठिकाणी अतिरेकी कॅम्प आहेत. त्यांची इंत्यभुत माहिती घेवून त्या ठिकाणी जवळपास वस्ती नाही. याचा अभ्यास करूनच हल्ला करण्यात आला होता. आमचा हल्ला अत्यंत प्रमाणात होता. आमच्यावर झालेल्या अतिरेकी हल्यांना रोखणे आणि भविष्यात होणाऱ्या अतिरेकी हल्यांना प्रतिरोध करण्यासाठी आम्ही ही कार्यवाही केली होती. अशा मोजक्या शब्दात सांगतांना भारतीय लष्कराच्यावतीने विमानातून मिसाईल टाकल्यानंतर घेण्यात आलेले व्हिडीओ सुध्दा प्रसारीत करण्यात आले होते. परंतू गोदी मिडीयाने भारताने पाकिस्तानमध्ये घुसून कार्यवाही केली, वेगवेगळ्या चॅनलने 90 ते 700 अतिरेकी मारले गेल्याचे सांगितले. अशा अफवा पसरवल्या. सैन्य दलाने पत्रकार परिषद घेतल्यानंतर तरी त्यात दुरूस्ती व्हायला हवी होती. परंतू आम्हीच देश चालवित आहोत हा भाव असलेल्या या चॅनल्सनी अनंत शब्दावलीचा वापर करून वेगळ्याच पध्दतीने बातम्या प्रसारीत केल्या. आपल्या दोन महिला प्रवक्तांमध्ये सैन्य दलाने कर्नल सोफिया कुरेशी यांना जागा दिली. यातून सैन्य दलात जातीचा विषय कुठेच नव्हता आणि सैन्य दलाने केलेली कार्यवाही सुध्दा जातीच्या आधारावर केलेली नाही तर ती आमच्यावर केलेल्या छुप्या हल्यामुळे होती हाच दिसतो. भारतात मात्र धर्म पुछ कर मारा असा प्रचार करणाऱ्यांना ही एक चपराकच होती.


7 मेचा सुर्योदय झाल्यानंतर पाकिस्तानने ओरड सुरू केली, आमच्या नागरीकांवर हल्ले झाले. मौलाना अजहर मसुदचे नाव वापरुन प्रसारीत झालेल्या एका बातमीनुसार या हल्यात त्याची मोठी बहिण, तिचा नवरा, त्याचा भाचा आणि त्याची पत्नी, एक भाची, एक सावत्र भाऊ आणि त्याची आहे असे एकूण 14 जण मरण पावले आहेत. हेच ते पाकिस्तानचे नागरीक आहेत काय? ज्यांच्यासाठी पाकिस्तान कांगावा करत आहे. या 14 जणांच्या अंतिम यात्रेची तयारी 7 मेच्या सायंकाळी झाली. त्यात पाकिस्तानचे राजकीय नेते, आयएसआयचे लोक उपस्थितीत होते. त्यांच्यासाठी अश्रु ढाळत होते. या अगोदर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत सांगितले की, 6 मेच्या रात्री 10 वाजता मला भारत काय करणार आहे याची सविस्तर माहिती प्राप्त होती. मग का तो हल्ला त्यांनी रोखला नाही. ते सांगत होते भारताचे पाच विमान आम्ही पाडले आणि जुन्या चित्रांना दाखवून ती विमाने पाडल्यााचे सांगितले जात आहे हा खोटा प्रचार आहे. संसदेतच शहबाज शरीफ मला आणि सेनाप्रमुख मुनीरला एका अंतिम यात्रेत इस्लामाबाद येथे जायचे आहे. आता पाकिस्तानचे पंतप्रधान आणि सेना प्रमुख ज्या अंतिम यात्रेत जात आहेत तो व्यक्ती मोठाच असणार. पण त्याचे नाव मात्र प्राप्त झाले नाही.
मौलाना अजहर मसुद, हाफिज सईद आणि सय्यद सलाउद्दीन हे कधीकाळी भारतातच होते आणि नंतर अतिरेकी झाले. त्यांनी काश्मिरी युवकांच्या हातात बंदुकी देवून भारता विरुध्द उभे केले. फाशी दिलेला अफजल गुरू बद्दल लोक सांगतात की तो झोपतच नव्हता. प्रत्येक क्षणात तो हाच विचार करायचा की मला भारताला काय त्रास देता येईल. अफजल गुरू तर संपला पण इतर तिन शिल्लक आहेत आणि या तिघांचा अंत होणार नाही तोपर्यंत पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्याने उध्वस्त केलेले अतिरेकी उत्पादन कारखाने पुन्हा सुरू होतील. यावर काही तरी कार्यवाही होण्याची गरज आहे. खरे तर 7 तारखेच्या 25 मिनिटांचा हल्ला कोठून लॉंच झाला हे पाकिस्तानला कळलेलेच नाही. कारण त्यात गनीमीकावा वापरण्यात आला होता आणि गनीमीकाव्याची शिकवण भारताला श्रीमानयोगी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. भारतीय सैन्याला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत.


भारताने अतिरेक्यांचे 9 अड्डे उध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी सैन्य पुंछ, राजोरी, बडगाम या काश्मिरमधील शहरांमध्ये रणगाड्यांचे गोळे फेकत आहेत. त्यामध्ये एका गुरुद्वाराद्वावर हल्ला झाला आहे. इतर अनेक ठिकाणी हल्ले झाले आहेत. त्यात जवळपास 15 पेक्षा जास्त भारतीय नागरीक मरण पावले आहेत. त्यातील दोन बालकांचा मृत्यू हृदय हेलावणारा आहे. म्हणूनच अतिरेकी अड्डे संपवून आम्ही विजयी झालो किंवा आतंक समाप्त झाला असे म्हणण्यात काही अर्थ नाही. मौलाना अजहर मसुद, हाफीज सईद, सय्यद सलाउद्दीन या तिघांना पाकिस्तानने कोठे लपवले आहे. हे शोधुन त्यांचा अंत करण्याची जबाबदारी आमच्या एखाद्या सुपूत्राने घेण्याची गरज आहे. तरच अतिरेकी उत्पादन कारखाने कायमचे बंद होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!