नांदेड(प्रतिनिधी)-14 मार्च रोजी चोरीला गेलेल्या एका वाहनाचा शोध नांदेड ग्रामीण पोलीसांनी लावून ते वाहन करोळी ता.पंढरपुर जि.सोलापूर येथून चोरट्यांसह पकडून आणले आहे.
दि.14 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास अशोक मधुकर मुंडे रा.सातेफळ ता.केज जि.बीड यांचे वाहन क्रमांक एम.एच.44 यु.3824 हे 3 लाख रुपये किंमतीचे नांदेड शहरातील वाडी पाटीजवळून चोरीला गेले होते. या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 322/2025 दाखल झाला होता. नांदेड ग्रामीण पोलीसांनी तांत्रिक मदत घेवून करोळी ता.पंढरपूर जि.सोलापूर येथील सर्जेराव उर्फ र ोहित दत्तात्रय पाटील (34) आणि सोलापूर जिल्ह्यातील पांंढरीवाडीचा तुकाराम नामदेव म्हैत्रे (27) या दोघांना पकडले. त्यांच्याकडून चोरीचे वाहन सुध्दा जप्त केले.
पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्र्वर मठवाड, पोलीस अंमलदार गटलेवार, पंचलिंग, माने, कानगुले यांनी ही कार्यवाही पुर्ण केली.
सोलापूर जिल्ह्यातून नांदेड ग्रामीण पोलीसांनी चोरीचे वाहन चोरट्यांसह पकडले
