नांदेड(प्रतिनिधी)-अमन कॉलनी नुरी चौक येथे दोन भावांनी मिळून एका 23 वर्षीय युवकाचा खून केला आहे. दोन मारेकऱ्यांना न्यायलयाने पोलीस कोठडीत पाठविले.
शेख जावेद शेख संदलजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 एप्रिलच्या रात्री 11 ते 11.30 वाजेदरम्यान अमन कॉलनी, नुरी चौक, उजवा वळण रस्ता येथे शेख सोहेल शेख जाफर आणि त्याचा भाऊ शेख जुनेद शेख जाफर यांनी संगनमत करून शेख इस्माईल शेख संदलजी (23) यास पैसे मागण्याच्या कारणावरून लाकडी दांड्याने मारुन खून केला. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103, 3(5) प्रमाणे गुन्हा क्रमांक 170/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक प्रदीप साखरे हे तपास करीत आहेत. पकडलेल्या शेख सोहेल आणि शेख जुनेदला विमानतळ पोलीसांनी आज न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने या दोघांना 5 मे पर्यंत पोलीस कोठडी पाठविले आहे.
युवकाचा खून करणारे दोन मारेकरी पोलीस कोठडीत
