नांदेड(प्रतिनिधी)-महिलेचा विनयभंग झाल्यानंतर 30 तासात त्याा आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून भाग्यनगर पोलीसांनी अतिजलदपणे उत्कृष्ट कार्यवाही केली आहे.
काल दि.1 मे 2025 रोजी सकाळी 10.40 वाजेच्यासुमारास भाग्यनगर पोलीस ठाण्यातच्या हद्दीत राहणाऱ्या एका 25 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गजानन घोगरे नावाचा व्यक्ती 1 मे च्या मध्यरात्री 1 वाजता त्यांच्या घरी आला आणि ओरडून आवाज दिल्याने ती महिला उठून घराबाहेर आली आणि महिला घराबाहेर आल्यावर तिचा हात धरुन गजानन घोगरे तिला ओढून सोबत घेवून जाण्याचा प्रयत्न करू लागला. महिलेच्या सासु आणि मावस सासु तिला वाचविण्यासाठी आल्या तेंव्हा तो त्यांनाही म्हणाला. हिला माझ्यासोबत पाठवा नाही तर मी जीव देईल असे म्हणाला. भाग्यनगर पोलीसांनी सकाळी 10.40 वाजता भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 351(3) प्रमाणे गजानन घोगरे विरुध्द गुन्हा क्रमांक 253/2025 दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक रामदास शेंडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार सविता केळगंद्रे यांच्याकडे दिला. सविता केळगंद्रे यांनी अत्यंत जलदगतीने चार साक्षीदारांचे जबाब नोंदवले, गजानन घोगरेला अटक केली आणि आज 2 मे रोजी दुपारी 2 वाजता दोषारोप पत्र क्रमंाक 100/2025 नुसार या गुन्ह्याचे दोषारोपपत्र 30 तासात न्यायालयात सादर केले. अत्यंत जलदगतीने केलेली ही दोषारोपपत्र दाखल करण्याची कार्यवाही ही नक्की प्रशंसनिय आहे.
विनयभंगाचे दोषारोपपत्र 30 तासात दाखल
