‘स्वारातीम’ विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी प्रथम पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त कुलगुरूंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, मा. व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, डॉ. पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, डॉ. डी. एम. खंदारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी मोहमद शकील अब्दुल करीम, नवोपक्रम नवसंशोधन व सहचर्य विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांच्या समवेत विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!