नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक बिअर बार आणि रेस्टॉरंट फोडून चोरट्यांनी 1 लाख 1 हजार 440 रुपयांची विदेशा दारु आणि बिआर चोरून नेली आहे. तसेच भोकर येथे 2 महिलांचे सोन्याचे गंठण तोडून चोरट्यांनी पळ काढला आहे. या ऐवजाची किंमत 1 लाख 37 हजार 500 रुपये आहे.
रमाकांत चंद्रकांत हिवराळे यांचे अर्धापूर तालुक्यातील पार्डी शिवारात गणराज बार ऍन्ड रेस्टॉरंट आहे. 26 एप्रिलच्या रात्री 12.30 ते पहाटे 6 वाजेदरम्यान त्यांच्या बारच्या पाठीमागील भिंतीचा कोपरा फोडून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि त्यातील विदेशी दारु व बिअर असा 1 लाख 1 हजार 440 रुपयांची दारु चोरून नेली आहे. अर्धापूर पोलीसांनी हा घटनाक्रम गुन्हा क्रमांक 258/2025 प्रमाणे दाखल केला असून पोलीस अंमलदार नरवाडे अधिक तपास करीत आहेत.
भोकर येथील मंजुषा बळवंतराव कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 एप्रिलच्या सकाळी 8 वाजेदरम्यान मंजुळानगर भोकर येथून त्यांच्या गळ्यातील 1 लाख 25 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण आणि दुसऱ्या एका महिलेच्या गळ्यातील 12 हजार 500 रुपये किंमतीचे मंगळसूत्र असा एकूण 1 लाख 37 हजार 500 रुपयांचा ऐवज तीन चोरट्यांनी तोडून नेला आहे. भोकर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 222/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक सुरेश जाधव अधिक तपास करीत आहेत.
दोन महिलांचे 1 लाख 37 हजार 500 रुपये किंतीचे गंठण तोडले
