अनोळखी 40 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यू संदर्भाने शोध पत्रिका जारी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे सापडलेल्या एका अनोळखी 40 वर्षीय मयताच्या नातलगांचा शोध व्हावा म्हणून नांदेड ग्रामीण पोलीसांनी शोध पत्रिका प्रकाशित करण्यासाठी पाठवली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णुपूरी येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात एक 40 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यदेह सापडला आहे. त्यासंदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस अंमलदार डी.डी.पांचाळ हे करीत आहेत.
पोलीसांनी दिलेल्या अनोळखी 40 वर्षीय व्यक्तीची माहिती अशी आहे. उंची 5 फुट 3 इंच, केस बारीक व दाढी बारीक, वर्ण काळा-सावळा, चेहरा लांबट, बांधा सडपातळ आहे.
पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यंानी जनतेला आवाहन केले आहे की, कोणी या अनोळखी मयत व्यक्तीला ओळखत असेल तर या संदर्भाची माहिती नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!