विरोधी पक्ष नेत्यांचे फोटो लावून देशाचे गद्दार असे प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कार्यवाही होणार काय?

देशात कालच्या रात्री अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्ष नेत्यांचे फोटो लावून देशाचे गद्दार असे मोठ-मोठे होर्डिंग लावण्यात आले आहे. ज्यावर हे होर्डिंग कोणी प्रिंट केले, कोणी प्रकाशीत केले, परवानगीचा क्रमांक, छापलेला नाही. सन 2023 मध्ये मोदी हटाव असे होर्डिंग लावलेल्या प्रकरणी दिल्ली पोलीसांनी जवळपास 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल केले होते. त्यात सहा जणांना पकडले होत आणि 36 खटले दाखल केले होते. आता या विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो लावून देशाचे गद्दार लिहिणाऱ्यांविरुध्द सुध्दा कार्यवाही होईल काय ? हा प्रश्न समोर आला आहे. या विरोधी पक्ष नेत्यांविरुध्द होर्डिंग लावणाऱ्यांनी प्रमाणपत्र दिले आहे की, हे देशाचे गद्दार आहेत. कारण त्यांनी वफ्फ विधेयकात सरकारच्या विरुध्द बोलले आहेत.


दिल्ली, ओडीसा, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये मोठ-मोठ्या चौकात, गर्दीच्या सार्वनिक ठिकाणी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी, ओडीसाचे मुख्यममंत्री हेमंत सोरेन, खा.वर्षा गायकवाड, खा. संजय राऊत, खा.अरविद सावंत, लालुप्रसाद यादव, तेजस्वि यादव, खा.संजयसिंह, मिसा भारती, दिग्वीजयसिह यांचे फोटो लावून हे देशाचे गद्दार आहेत. कारण यांनी वफ्फ विधेयकाच्या चर्चेदरम्यान सरकारविरुध्द बोलले आहेत. ज्या पध्दतीने हे होर्डिंग लावण्यात आले आहे आणि सर्वत्र एकाच प्रकारचे होर्डिंग आहेत. म्हणजे हा एक नियोजनबध्द केंद्रीय कट आहे. कारण सर्वच होर्डिंग एकाच सारखे आहेत. होर्डिंग लावतांना ते काही क्षणात होणारे काम नाही. त्यासाठी भरपूर वेळ लागतो. भरपूर साहित्य लागते आणि भरपूर माणसे लागतात. म्हणजे हे लपून छपून केलेले काम सुध्दा नाही. काही ठिकाणी तर भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाने हातात छोटे पोस्ट घेवून या सर्वांचा देशाचे गद्दार म्ळणून निघेश पण केलेला आहे.
लोकसभा किंवा राज्यसभा या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक खासदाराचा हा अधिकार आहे की, सरकारने आणलेल्या विधयेकावर बोलणे, कोणी त्या विधेयकाच्या बाजूने बोलेल. तर कोणी विधयेकाविरुध्द बोलेल. प्रत्येक राजकीय पक्षाचे आपले धोरण आहे आणि आपल्या राजकीय पक्षाच्या धोरणाप्रमाणे त्या खासदाराला तेथे बोलावेच लागते. हा भारतीय संविधानाने त्यांना दिलेला अधिकार आहे. मग भाजप युवा मोर्चाला कोणी हा अधिकार दिला की, देशाचे गद्दार जाहीर करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. किंवा ते सक्षम प्राधिकरण आहेत काय ? यावर खा.संजयसिंह यांनी आपल्यावतीने उत्तर देतांना सांगितले आहे की, प्रभु श्री रामचंद्र यांच्या मंदिरातील चंदा चोरणारे, अयोध्येत रक्षा विभागाची जमीन अडाणीला देणारे, काशीमध्ये 300 पेक्षा जास्त मंदिर तोडणारे, गाय कापणाऱ्या कंपनीकडून निवडणुक चंदा घेणारे, हिंदु धर्मासोबत गद्दारी करणारे भाजपाई माझ्याविरुध्द होर्डिंग लावत आहेत. तेंव्हा हिंदुंनो सावधान तुमच्या मंदिरांच्या जमीनीवर सुध्दा पुढे कब्जा करून नरेंद्र मोदी ती जमीन अडाणीला देतील. झारखंडमध्ये तर भाजप युवा मोर्चाच्या युवकांनी आपल्या हातात हार्डिंगचे प्रतिकृती हातात घेवून वफ्फ बिलाच्या विरोधात काम करून तृष्टी करणाचे राजकारण करणारे हे नेते देशाचे गद्दउार आहेत. म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो. असे जाहीर केले आहे. हे सर्व पाहता भारतीय राजकारणाची परिस्थिती श्रेणी 3 पेक्षा सुध्दा खाली गेल्याचे दिसते.


ज्या भारतीय जनता पार्टीला मुस्लिम समाजाशी काही देणे नाही त्यांनी वफ्फ ओर्ड आणून मुस्लिमांना टार्गेट केले आहे. खरे तर मुस्लिमांबद्दल एवढे प्रेम कसे आहे हा ही एक मोठद्या शोध विषय आहे. आता या कायद्यासंदर्भाने सर्वाच्च न्यायालयात मोठे वाद घडतीलच.न्यायालय काय निर्णय देईल् याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. मोदी हटाव या दोन शब्दांचा विचार केला तर हे राजकीय शब्द आहेत. प्रत्येक पक्ष विरोधी पक्षा संदर्भाने असे दोन शब्द नेहमीच वापरतात. याच शब्दांना वापरून सन 2023 मध्ये दिल्लीमध्ये काही होर्डिंग लावले होते. यावर बोलतांना दिल्लीचे पोलीस अधिकारी दिपेन पाठक यांनी त्यावेळी सांगितले होते की, होर्डिंगवर प्रिंट प्रेसचे नाव नाही, ही होर्डींग कोणी लावली हे लिहिलेले नाही. मुद्रकाचे नाव लिहिलेले नाही आणि सार्वजनिक संपत्तीचे विरुपण होत आहे. म्हणून या विरुध्द कार्यवाही करण्यात आलेली आहे. या प्रकरणात 5 वर्षाची शिक्षा असल्याचेही पाठक यांनी संागितले होते. पाठक यांनी सांगितल्याप्रमाणे आता विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोटो लावून त्यावर देशाचे गद्दार लिहिलेल्या होर्डिंवर सुध्दा दिपेश पाठक यांनी सांगितल्याप्रमाणे काहीच मुद्‌‌रीत केलेले नाहीत. मग त्याच प्रकारची कार्यवाही आता होईल काय? पण सध्या दिल्ली पेालीसांनी असे काही न करता आम्ही होर्डिंग लावणाऱ्यांचा शोध घेत आहोत असे सांगितले आहे. पण काही राज्यांमध्ये भाजप युवा मोर्चाने हे होर्डिंग आमचेच असल्याचे जाहीरपण केले आहे. मग आता शिल्लक काय राहिले. खरे तर शिल्लक आहे. या सर्व कामाचा केंद्र बिंदु कोण आहे. हे शोधायला हवे. लोकशाहीच्या मंदिरात आपल्या लोक तांत्रिक अधिकारांचा वापर करून बोलणे गद्दारी होवू शकते काय? हा प्रश्न आम्ही जनतेसाठी सोडत आहोत. काही दिवसांपुर्वीच महाराष्ट्रात एक विनोदी नट कुणाल कामराने तयार केलेल्या एका रॅपनंतर त्याच्याविरुध्द झालेला उद्रेक लोकशाहीचाच प्रकार आहे काय? हा ही प्रश्न आम्ही जनतेसाठी सोडत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!