10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात दोन जणांना सात दिवस पोलीस कोठडी; एकूण अटक आरोपींची संख्या नऊ

नांदेड(प्रतिनिधी)-10 फेबु्रवारीच्या गोळीबार प्रकरणात आज मकोका विशेष न्यायालयाने दोघांना सात दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणातील तीन जण 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
10 फेबु्रवारी रोजी शहरातील शहिदपुरा भागात झालेल्या गोळीबार प्रकरणात एका युवकाचा मृत्यू झाला होता आणि एक जखमी झाला होता. या प्रकरणात गोळीबार करणारा जगदीशसिंघ उर्फ जग्गा हा पंजाब राज्यातील रहिवासी आहे. त्याच्यासोबत पंजाबचे दोन आणि इतर नांदेडमध्ये त्यांना सहकार्य करणारे असे 8 आरोपी अटक झाले होते. त्यातील मनप्रितसिंघ उर्फ मन्नु गुरबक्षसिंघ ढिल्लो उर्फ नहेंद (31), हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पी बाबुसिंघ कारपेंटर (25) रा.नांदेड, अर्शदिपसिंघ भजनसिंघ गिल (22) रा.पंजाब या तिन जणांना मकोका न्यायालयाने 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी हरजितसिंघ उर्फ राजू अमरजितसिंघ गिल (32), आणि नव्याने पकडण्यात आलेला जगजितसिंघ उर्फ जग्गी दिलबागसिंघ संधू या दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने मकोका न्यायालयात हजर केले. सहाय्यक सरकारी वकील ऍड.यादव तळेगावकर यांनी पकडलेल्या दोघांना पोलीस कोठडी मिळणे का आवश्यक आहे. याचे सविस्तर विवेचन न्यायालयासमक्ष केल्यानंतर मकोका न्यायालयाने या दोघांना सात दिवस अर्थात 26 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…

10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात 9 वा आरोपी पंजाबमध्ये पकडला ; तिन जणांना सहा दिवस वाढीव पोलीस कोठडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!