नांदेड(प्रतिनिधी)-श्री बागेश्र्वरपिठाचे पिठाधिश्वर प.पु.पंडीत श्री.धिरेंद्र शास्त्री यांनी नंादेड शहरातील पंचमुख्यी हनुमान मंदिर येथे कार्यरत असलेल्या श्री.बागेश्र्वर धाम जिल्हा समिती कार्यालयाला भेट दिली आणि श्री.बागेश्र्वर धाम सेवा समितीच्यावतीने जिल्ह्यात चालणाऱ्या विविध कार्यक्रमांचे कौतुक केले.
पिंपळगाव येथे आयोजित महाशिवपुराण कथेनंतर पंडीत धिरेंद्र शास्त्री नांदेडला होते. श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदु स्वराज्याची एकजुट आम्हा सर्वांना राखायची आहे. भारतात रघुविर श्री.राम महान आहेत. भगवान श्री राम आमचे आदर्श आहेत. आपले राष्ट्र मजबुत ठेवायचे असेल तर श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व मावळ्यांनी एकत्र आले पाहिजे. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, आम्ही फक्त हिंदुत्वाबद्दल बोलतो. आज जर सर्व हिंदु जागे झाले नाही तर पुन्हा एकदा प्रभु श्री रामाच्या अस्तित्वाचा पुरावा मागला जाईल. आपल्या धर्मासाठी आपण कट्टरता बाळगणे आवश्यक आहे. कारण आपली कट्टरताच आपल्या धर्माची श्रध्दा मजबुतपणे दाखवते आणि ही श्रध्दा आम्हाला सर्वत्र प्रसारीत करायची आहे. धर्माचे रक्षण झाले तर धर्म आपली रक्षा करेल असे धिरेंद्रकृष्ण शास्त्रीजी म्हणाले.
श्री.बागेश्र्वर धाम सरकार यांच्या आदेशाने नांदेड जिल्ह्यात विविध प्रकारचे अभियान बागेश्र्वर धाम समितीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक अभिजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा संयोजक संदीप कऱ्हाळे पाटील हे करत असतात. श्री.बागेश्र्वर धाम सेवा समिती नांदेड अंतर्गत मंदिर, शाळा, दवाखाना परिसर, स्मशानभुमी, डोंगराळ भाग अशा विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. नांदेड शहरातील व जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये हनुमान चालीसा पठण केले जाते. श्री बागेश्वर धाम सेवा समिती प्लॉस्टिक मुक्ती व्हावी म्हणून महाप्रसादाच्यावेळी केळींच्या पानांचा उपयोग करते. श्री.बागेश्वर धाम सेवा समिती नांदेडच्यावतीने वर्षातून दोन वेळेस महारक्तदान शिबिर आयोजित केल्या जाते. तसेच समिती सदस्यांच्या जन्मदिनी गायींना चारा व महिन्याला समिती सदस्यांच्याावतीने गोशाळेत चारादान केला जातो. भटक्या आणि मुक्त जनावरांचे अंतिमसंस्कार समितीच्यावतीने करण्यात येते. श्री.बागेश्र्वर धाम सेवा समितीच्याावतीने दरमहिन्यात महाआरती करून धर्माचा प्रचार केला जातो. दर शनिवारी व मंगळवारी श्री.बागेश्वर धाम सेवा समितीच्या कार्यालयात आणि विविध शाखांमध्ये हनुमान चालीसा पठण आणि आरती केली जाते.
आपल्या धर्मासाठी आपण कट्टर राहा-पंडीत श्री.धिरेंद्र शास्त्री
