गोरठ्यात 25 ते 30 वयोगटाच्या अनोळखी व्यक्तीचे जाळलेले प्रेत सापडलेले आहे

पोलीसांचे जनतेला ओळख पटविण्यासाठी आवाहन
नांदेड(प्रतिनिधी)-उमरी तालुक्यातील गोरठा गावाजवळ 25 ते 30 वयोगटातील पुरूष जातीचे अनोळखी माणसाचे प्रेत सापडले आहे. या संदर्भाने कोणास काही माहिती असेल तर जनतेतील लोकांनी या मरण पावलेल्या अनोळखी माणसाची ओळख पटविण्यासाठी पोलीसांची मदत करावी असे आवाहन उमरी पोलीसांनी केले आहे.
गोरठा येथील पोलीस पाटील सुभद्रा शेषराव सावळे यांनी दिलेल्या खबरीनुसार 12 मार्च रोजी सकाळी 6.30 वाजता गोरठा गावातील जयवंत खांडरे हे मार्निंग वॉकला गेले होते आणि त्यांनी सांगितले आहे की, गणेश गुणाजी गिरी यांच्या शेताजवळ, उमरी ते नांदेडकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला एक अनोळखी माणुस जाळलेल्या स्थितीत रस्त्याच्या खाली नाल्यामध्ये पडलेला आहे. त्यानुसार उमरी पोलीसांनी या आलेल्या माहितीच्या शोध घेतला.
त्या ठिकाणी एक अनोळखी पुरूष जातीचे 25-30 वयोगटातील व्यक्तीचे जळालेल्या अवस्थेतील प्रेत सापडले आहे. या व्यक्तीच्या शरिरावर पांढरट भुरकट रंगाच्या काळ्या रेषा असलेला चौकटा शर्टचा अर्धवट जळालेला तुकडा सापडलेला आहे. मरण पावलेल्या व्यक्तीच्या उजव्या हातातील मधल्या बोटात पांढऱ्या रंगाच्या धातूची निलम खड्याची अंगठी सापडली आहे. या मरण पावलेल्या व्यक्तीच्या गळ्यात एक पिवळसर, निळसर रेषा असलेला चौकडा रुमा अर्धवट जळालेला आहे. त्याच्या कंबरेला लाल रंगाचा आठ पदरी करदौडा सापडला आहे.
उमरी येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक अंकुश शिवाजी माने यांनी जनतेला आवाहन केले आहे की, बातमीतील वर्णनासारखा व्यक्ती गायब असल्याची माहिती नागरीकांना असेल तर त्यांनी पोलीस ठाणे उमरी येथे संपर्क साधावा. सहाय्यक पोलीस निरिक्षक अंकुश माने यांचा मोबाईल क्रमांक 9922741854, पोलीस अंमलदार भालेराव यांचा मोबाईल नंबर 7030221125 आणि पोलीस अंमलदार केळकर यांचा मोबाईल नंबर 7972 767735 यावर सुध्दा माहिती द्यावी जेणे करून मरण पावलेल्या अनोळखी माणसाची ओळख पटवणे शक्य होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!