नांदेड(प्रतिनिधी)-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जन्मोत्सवानिमित्त वकील संघटनेच्यावतीने कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे.
नांदेड अभिवक्ता संघामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ऍड.प्रकाश टोम्पे यांच्या अध्यक्षतेखाली सन 2025 मधील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नविन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. त्यात अध्यक्ष पदावर ऍड.बी.एम.गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिव पदावर ऍड. किरण चावरे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. उपाध्यक्ष या पदावर ऍड. महेंद्र वावळे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. सहसचिव पदावर विकास नरवाडे हे आहेत. कोषाध्यक्ष पदावर ऍड.गौतम किनीकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. या समितीमधील सदस्य पदावर ऍड. डी.टी. शेळके, ऍड. लता नवघडे, ऍड.एम.बी.टिळकेकर, ऍड.बी.एन.भालेराव, ऍड.शिवराज कोळेकर यांना नियुक्ती मिळाली आहे. या समितीत सल्लागार पदावर ऍड.तृप्ती सोनकांबळे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. या मंडळाची निवड झाली तेंव्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍड.आशिष गोदमगावकर, ऍड. अनिल पाटील यांची उपस्थिती होती.
वकील संघटनेच्यावतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जन्मोत्सवानिमित्त नवीन कार्यकारणी
