नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी पोलीसांनी अवैधपणे वाळू भरून जाणाऱ्या हायवा गाडीला पकडले आहे. दोन जणांविरुध्द भारतीय न्याय संहितेप्रमाणे कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस अंमलदार रविंद्र सुधाकरराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.11 मार्च रोजी मध्यरात्रीनंतर 2.30 वाजेच्यासुमारास गस्त करत असतांना त्यांना पिंपळगाव या शिवारातून अवैध वाळू वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्या भागात जाऊन संत कबीर विद्यालयासमोर बिलोली येथे उभा असलेला हायवा ट्रक क्रमांक जी.जे.36 टी.5211 या ट्रकची तपासणी केली. त्यामध्ये वाळू भरलेली होती. वाळू संदर्भाचे कागदपत्र त्यांना दाखवता आले नाही. तेंव्हा पोलीसांनी 18 लाखांचा ट्रक आणि 25 हजारांची वाळू असा 18 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.एस.आरसेवार, पोलीस अंमलदार रणजित मुदीराज, बद्रीनाथ इंदेपवाड, मारोती सोनटक्के यांनी ही कार्यवाही केली. कुंडलवाडी पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 47/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आरोपी सदरात धम्मानंद शंकर सोनकांबळे आणि दत्ता पाटील शिंदे या दोघांची नावे आहेत.

