आयसीसी क्रिकेट मालीकेत भारताने 20 वर्षानंतर विजेते पद मिळवले. या विजेयाचा स्वाभिमान किंबहुना अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटायलाच हवा. कारण भारताने हे विजेते पद जिंकतांना बलाढ्य असलेल्या न्युझीलंडला हरवले आहे. ती कोण्या एका व्यक्तीची कामगिरी नाही. 12 खेळणारे खेळाडू, राखीव असलेले 4 खेळाडू, त्यांचे वैद्यकीय पथक आणि प्रशिक्षक या सर्वांचा एकजुटपणा त्या विजयाचे कारण आहे. हा सामना पाकिस्तानविरुध्द नव्हता. ज्याचा जल्लोष करतांना मशिदीसमोर अकराळ विकराळ चाळे करण्याची गरज नव्हती. सोबतच रस्त्यावर वाहतूक विस्कळीत करून पोलीसांच्या अंगावर फटाके उडविण्यासाठी हा जल्लोष नव्हता.

भारतासमोर एवढे असंख्य प्रश्न आहेत. ज्यावर चर्चा घडण्याची गरज आहे. पण भारताच्या विजयाचा आनंद यावर चर्चा होत आहे. होळीमध्ये रंग लागला तर तुमच्या शरिराचा तो अवयव कापून टाकून टाका असे बोलले जात आहे. यातून देश कोठे चालला आहे. याचा विचार करण्याची नितांत गरज आहे. दुबईमध्ये झालेल्या सामन्यात मोहम्मद शमी हा गोलंदाज पाणी पित असतांनाचा फोटो पाहुन काही मुस्लिम धर्मगुरूंनी सुध्दा त्यावर ट्रोल केले. की त्याने रोजा(उपवास) केला नाही. दुबईची दाहकता, भारतासाठी खेळ आणि रोजा या चर्चेचा मेळ कोठेच बसत नाही. हा निव्वळ फालतूपणा आहे.
काल भारताने आयसीसी क्रिकेट मालिकेमधील विजेते पद मिळवले. 12 वर्षानंतर हे विजेते पद प्राप्त झाले आहेत. त्याचा जल्लोष करणे हा प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा घटनाक्रम आहे. पण काल महु (मध्यप्रदेश) मध्ये एका टोळक्याने हा जल्लोष साजरा करतांना मशिदीसमोर जाऊन जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. क्रिकेट सामन्यातला विजय आणि जय श्रीरामचा घोषणा याचा अर्था अर्थी काही संबंध नाही. जे क्रिकेट प्रेमी आहेत ते जल्लोष साजरा करतीलच. पण 75 वर्ष वय असलेले क्रिकेटपटू सुनिल गावस्कर हे 18 वर्षाचा बालक असल्यासारखे नाचत होते. हाच भाव आपल्या सर्वांमध्ये असायला हवा. मशिदीसमोर जाऊन जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने तुमच्या क्रिकेट सामन्यातील विजयाचा आनंद दिसत नाही. तर उलट प्रत्येक हिंदु व्यक्तीच्या मनात असलेली प्रभु श्रीरामचंद्राबद्दलची श्रध्दा रस्त्यावर आल्यासारखी वाटते. मशिदीसमोर तुमच्या पध्दतीने आनंद व्यक्त करतांना हे सुध्दा विसरले नाही पाहिजे की, विजय मिळवणाऱ्या क्रिकेट संघामध्ये मोहम्मद शमी हा खेळाडू पण आहे. क्रिकेट सामन्यानंतर विराट कोहली मोहम्मद शमींच्या माोश्रीला भेटला तेंव्हा हिंदु धर्म पध्दतीप्रमाणेच विराट कोहलीने मोहम्मद शमीच्या आईच्या पायांना हात लावला. हे दृश्य पाहुन मोहम्मद शमीला आपले आश्रु रोखता आले नाही.

त्यानंतर विराट कोहलीने त्यांच्यासोबत एक सुंदर फोटो काढला. कारण भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या मित्राची आई सुध्दा आपलीच आई असते असे मानण्याची संस्कृती आहे तिला का विसरला. महुच्या मशिदीसमोर झालेल्या घोषणाच्या परिणामात मुस्लिमांनी सुध्दा प्रतिक्रिया दिली. ती पण वाईटच होती. पोलीसांनी सर्व प्रकरण हाताळले असे सांगितले जात आहे. आमच्या मते आपला आनंद साजरा करणाऱ्यांनी हिंदुस्थान जिंदाबाद, भारतीय क्रिकेट टिम जिंदाबाद, अशा घोषणा दिल्या असत्या तर आम्ही सुध्दा त्याचे समर्थन केले असते. सोबतच या घोषणा देतांना तेथे दगडफेक झाली असती तर आम्ही सुध्दा त्याच्या विरोधात उभे राहिलो असतो, लिहिलो असतो. पण तुम्ही दिलेल्या घोषणा म्हणजे तो मुस्लिम समाजाचा अपमान होता, त्यांना चिथावणी देण्यासारखे होते. आजपर्यंत आम्ही महु या गावाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव या नावाने ओळखत होतो. पुढे कालच्या घटनेनंतर हिंदु-मुस्लिम वाद या नावाने ओळखू याचे दु:ख वाटते. या ठिकाणी काही घरे पण जाळण्याचा प्रयत्न झाला ते लवकर विसरता येईल काय?
अशा प्रकार महुमध्येच घडला नाही. अमरावती शहराच्या राजकमल चौकात भारतीय विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या टोळक्याने वाहतुक खोळंबून टाकली. वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असतांना त्यांच्या अंगावर फटाके फोडण्याचा प्रयत्न झाला. मग पोलीस पोलीसच असतात त्यांनी आपल्या पध्दतीने कार्यवाही केली आणि गुन्हे दाखल केले. काय मिळवले या आनंदातून. कारण ज्या पोलीसाच्या अंगावर फटाके उडविण्याचा प्रयत्न झाला तो काही मुस्लमान होता काय? पोलीसांसोबत बाचा-बाची करणे, हातापायी करणे कितपत योग्य आहे. अशीच एक घटना तेलंगणा राज्यात घडली. तेथे सुध्दा ट्राफीक जाम झाला आणि पोलीसांशी विजयाचा जल्लोष साजरा करणाऱ्यांनी गोंधळ घातला. महुच्या घटनेवर, अमरावतीच्या घटनेवर काही न बोलणारे मोदींच्या व्हाटसऍपचे प्रमुख अमित मालवी यांनी तेलंगणाच्या घटनेवर मात्र बोलले. अमित मालवी सांगतात तेलंगणा राज्यातील पोलीसने भारताच्या विजय साजरा करू दिला नाही. हा दुप्पटीपणा आहे की, नाही. कारण तेलंगणा राज्यात कॉंगे्रसचे सरकार आहे. म्हणून त्यांच्या विरुध्द बोलले. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र येथे भाजपची सरकार आहे म्हणून त्याविरुध्द अमित मालवी हे बोलले नाही. कोणाकडून शिकावे देशप्रेम हा प्रश्न आम्ही वाचकांवर सोडतो.

उत्तरप्रदेशमधील संबल जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक असे सांगतात की, ज्यांना रंगाची गृणा आहे. त्यांनी धुळवंडीच्या दिवशी घरातून बाहेर निघू नये. त्या दिवशी शुक्रवार आहे. अर्थात मुस्लिमांच्या शब्दात जुम्मा आहे तोही रमजान महिन्यातील जुम्मा आहे. त्याबद्दल योगी आदित्यनाथ सुध्दा सांगतात वर्षात 54 जुम्मा येतात. पण धुळवंड एकच येते. पोलीस अधिक्षक संबल सांगतात की, तुमच्या अंगावर रंग लागला. तर शरिराचा तो अवयव कापून टाका. जुम्मा किंवा रमजानचा जुम्मा आणि धुळवंड एकाच दिवशी आली हा काही आजचा पहिलावेळ नाही. या पुर्वीसुध्दा असंख्य वेळेस अशाच दिवशी धुळवंड आलेली आहे. त्या सणांमध्ये काही झाले नाही. पण तुमचे बोलणे, तुमच्या अधिकाऱ्यांचे आदेश चुकीचे आहेत याची जाण सुध्दा तुम्हाला नाही. असो हिंदु-मुस्लिम या दोन्ही धर्मांमध्ये किंवा संस्कृतीमध्ये असे सांगितले जाते जे पेराल तेच उगवले. कृपया चुकीचे पेरु नका कारण भारत हा देश अर्वाचिन काळापासून समृध्द देश मानला गेला आहे.
प्रत्येक राजकीय पक्षाचे ओव्हरसिज अध्यक्ष आहेत. म्हणजे विदेशात सुध्दा राजकीय पक्षांचे अध्यक्ष आहेत. त्यात कॉंगे्रसचे अध्यक्ष सॅमइस्त्रोदा हे आहेत. त्यांच्या एका वक्तव्यावर भारतात केवढा गोंधळ झाला होता हे वाचकांना आठवत असेल. असाच एक ओव्हरसिज अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा ऑस्ट्रेलियात होता. त्याचे नाव बालेश धनकड असे आहे. त्याचे वय 40 वर्ष आहे. त्याने 5 कोरियन महिलांवर बलात्का केल्याप्रकरणी त्याला 40 वर्षाची शिक्षा ऑस्ट्रेलियन न्यायालयाने दिली आहे. त्याची चर्चा कोणीच करत नाही. किती दुर्देव आहे ना. काल परवाच भारताचे पंतप्रधान वनतारा या खाजगी अभयरण्यात जाऊन आले. आफ्रिकेतील एका वन्यजीव संस्थेने त्या खाजगी अभयरण्यात वन्य पशु कसे पोहचले असा प्रश्न उपस्थित केला आहे. या सर्व विषयांवर चर्चा करा ना. आमच्या देशात एवढे संकट आहेत की, ट्रॅम्प आम्हाला त्रास देत आहे, चिन आमच्या जमीनी हडप करत आहेत. त्यावर चर्चा करा ना.भारतावर असलेले कर्ज कसे फिटणार, त्यासाठी उत्पन्नाचा स्त्रोत काय यावर चर्चा करा ना. यावर कोणी चर्चा करत नाही. याचे खुप दु:ख वाटते. भारतात सामाजिक आणि धार्मिक सौहार्दाचा आलेख बिघडायला नको यासाठी आम्ही एवढी मेहनत घेतली आहे. वाचकांनो तुमच्या मदतीशिवाय मात्र आमची ही मेहनत पुढे जाणार नाही.