नांदेड(प्रतिनिधी)-28 फेबु्रवारी रोजी धर्माबाद येथून भरलेला 16 लाख 69 हजार 150 रुपयांचा हरभरा आपल्या विहित ठिकाणी न पोहचवून ट्रक चालक आणि एका अनोळखी माणसाने फसवणूक केल्याचा प्रकार धर्माबाद पोलीसांनी दाखल केला आहे.
धर्माबाद येथील ओमनारायण नंदकिशोर कासट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 फेबु्रवारी 2025 रोजी त्यांनी आपल्या मनश्री ट्रेडींग कंपनी धर्माबाद येथून ट्रक क्रमांक एम.एच.21 बी.एच.8776 मध्ये 595 पोते हरभरा एकूण वजन 305 क्विंटल 3 किलो भरला होता. या हरभऱ्याची किंमत 16लाख 69 हजार 150 रुपये आहे. या बाबत ट्रक चालक गणेश मोरे आणि त्यांच्यासोबत एक अनोळखी माणुस या दोघांना हा हरभरा मॉं अंबे ट्रेडर्स नागपूर येथे पोहचवायचा होता. परंतू त्या दोघांनी विश्र्वासघात करून हरभरा येथे पोहचविलाच नाही. धर्माबाद पोलीसांनी या फसवणूकीसाठी गुन्हा क्रमांक 58/2025 दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
16 लाख 80 हजारांचा हरभरा गंतव्यस्थळी पोहचलाच नाही
