नरेंद्र मोदी यंानी एका खाजगी प्राणी संग्राहलयात भेट देवून तेथे छाव्यांना दुध पाजल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. एकीकडे भारताच्या सर्वसामान्य माणसाची किंमत कमी-कमी होत चालली आहे. पण मोदीजींना जनावरांमध्ये जास्त रस आहे. या घटनेला गोदी मिडीयाने हिम्मत पाहा पंतप्रधानाची अशी प्रसिध्दी दिली. अरे वाघांसोबतची हिम्मत पाहायची असेल तर जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांची एक दुर्लब फोटो उपलब्ध आहे. तसेच आजच्या परिस्थितीत नुमान हसन हा व्यक्ती एक नव्हे तर असंख्य वाघांसोबत मोकळ्यात खेळत असतो. तो काचांच्या मागे बसून फोटोग्राफी करत नाही. यातही सर्वात महत्वाची बाब अशी आहे की, माहितीच्या अधिकारात केंद्र सरकारच्या प्रदुषण मंत्रालयाने वनतारा नावाचे अभयारण्य या देशातच कुठे नाही असे सांगितले आहे. म्हणजे एका अवैध, परवानगी नसलेल्या प्राणी संग्राहालयात भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी हे भेट देतात आणि तेथे आनंद साजरा करतात.
मागील दहा वर्षामध्ये अनेक शासकीय प्रतिष्ठांणांना त्यांचे मार्गक्रमन चांगले नाही म्हणून खाजगी हातांमध्ये दिले गेले. प्राणी संग्राहालय, अभयारण्य चालविण्याचे अधिकार आजपर्यंत फक्त सरकारलाच होते. वन विभागाच्यावतीने याची देखरेख केली जात होती. पण सन 2020 मध्ये रिलायन्स पेट्रो केमिकल या कारखान्यासाठी दिलेल्या 3 हजार एकर जागेत हे वनतारा अभयारण्य अंबानी पुत्र अनंत अंबानी यांनी सुरू केले आहे. त्यामध्ये भारताच्या अनेक अभयारण्यातील अनेक दुर्लभ जनावरे तेथे आणली आहेत. विदेशातील सुध्दा अनेक जनावरांना तेथे आणले आहे आणि पाच वर्षानंतर भारताच्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी भेट देवून एक जखमी हत्ती दाखवत त्याच्यावर झालेला अन्याय आपल्या शब्दात व्यक्त केला आहे. आता अंबानी कुटूंबिय ज्यांना अभयारण्य चालविण्याचे कोणतेही अनुभव नाहीत. त्यांना अभयारण्य तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ता कुणाल शुक्ला यांनी एक प्रश्न भारत सरकारला विचारला गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या वनतारा या अभयारण्यात सन 2020 ते 2025 या दरम्यान किती वन्य जीवांचा मृत्यू झाला. त्यांनी हा प्रश्न यासाठी विचारला की, भारताच्या वन कायद्याप्रमाणे कोणत्याही वन्यजीवाचा मृत्यू झाला तर त्याची अंतिमक्रिया भारतीय वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष होणे असे त्या कायद्यात नमुद आहे. कुणाल शुक्लाच्या या प्रश्नाला उत्तर देतांना केंद्र सरकारने सांगितले की, भारतात वनतारा नावाचे अभयारण्यच नाही. याचा अर्थ एका अवैध, बेमालुमपणे बनवलेल्या त्या अभयारण्यात भारताचे पंतप्रधान जातात. तेथे जावून जनावरांचे प्रेम व्यक्त करणाऱ्या नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये 286 वाघ आणि 456 बिबटे मरण पावले आहेत त्याचे काय? भारतात मणीपुर जळत आहे. तेथे जाऊन त्या जनतेला हिम्मत देण्याची ताकत नरेंद्र मोदीमध्ये नाही. पण वनतारामध्ये काचांच्या मागे लपलेल्या वाघांसोबत फोटो काढले. खरे तर नोमान हसनचे व्हिडीओ पाहवे तो एकटा अनेक वाघांसोबत खेळत असतो. त्याला म्हणतात हिम्मत.
त्या अवैध अभयारण्यात 25 हजार जनावरांना सुरक्षीत केल्याचे सांगण्यात येते. पेट्रो केमिकलच्या शेजारी अभयारण्य उभारता येते काय? पेट्रो केमिकलमध्ये काही दुर्घटना घडली तर काय? आम्ही एखादा पोपट आपल्या घरात पिंजऱ्यात ठेवला तर आम्हाला तुरूंगाची हवा दाखवली जाते आणि या अभयारण्यात हत्ती, गेंडा, झेबरा, टायगर, बिबटे यांच्यासह जगातील अनेक प्राणी आहेत. जे नष्ट होत चालले आहेत. मागच्या काही वर्षापुर्वी उत्तर प्रदेशमध्ये एक सारस पक्षी आणि आरीफ यांची मैत्री गाजली होती. त्या दोघांना भेटण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव पण गेले होते. पण अमेठी वन विभागाने नैसर्गिक जागा आणि सुरक्षा या दोन शब्दांच्या आधारे सारस आणि आरीफ यांच्या मैत्रीत कात्री चालवली आणि त्यांना वेगळे केले. भारतात इंग्रजांचे राज्य होते तेंव्हा डॉग्स ऍन्ड इंडियन्स आर नॉट अलाऊड अशा पाट्या लावल्या जात होत्या. वनतारा अभयारण्य सुध्दा सर्वसामान्य माणसांसाठी नाही. या संदर्भाने हे अभयारण्य सुरू होण्यापासून रोखावे म्हणून याचिका दाखल झाली पण सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा बनवू द्या असे सांगितले. आजच्या परिस्थितीत धनवान व्यक्तीच या देशाचा सर्वकाही आहे इतर सर्वसामान्य भारतीय मात्र रस्त्यावर पडलेलेच आहेत. भारताची मिडीया आपला आत्मा विकलेली नसती तर कुणाल शुक्ला यांना मिळालेल्या आरटीआय उत्तरानंतर त्या मिडीयाने धिंगाना घातला असता. पण आज ते का गप्प आहेत. आता लिहिण्याची गरजच राहिलेली नाही.