नांदेड(प्रतिनिधी)-बस वाहकाला सन 2018 मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीला कंधार जिल्हा न्यायाधीशांनी सहा महिने कैद आणि अडीच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
दि.6 जानेवारी 2018 रोजी सकाळी 6 वाजता महिला बस वाहक ही नंदशिवणी या ठिकाणी सकाळी 7.30 वाजता बस पोहचली असतांना बसमधील प्रवाशी ईश्र्वर गणपती होळगिर यास महिला वाहकाने त्याचे आणि मुलाचे तिकिट देण्यासाठी पैसे मागितले. मुलाचे तिकिट काढत नाही यावरून वाद झाला. तेंव्हा ईश्र्वर होळगिरने महिला वाहकास थापडबुक्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली, जिवे मारण्याची धमकी दिली आणि शासकीय कामात अडथळा केला.
या प्रकरणी माळाकोळी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 18/2018 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आणि तपासाअंती ईश्र्वर गणपती होळगिर याच्याविरुध्द कंधार न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात या खटल्यात सात साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. त्यात कंधार न्यायाधीशांनी ईश्र्वर होळगिर यास कलम 353 साठी 6 महिने कैद आणि 1 हजार रुपये रोख दंड, 332 साठी 6 महिने कैद आणि 1 हजार रुपये रोख दंड तसेच कलम 506 साठी दोन महिने कैद आणि 500 रुपये दंड अशा शिक्षा ठोठावल्या या सर्व शिक्षा ईश्र्वर होळगिरला एकत्रीत भोगायचाा आहेत. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड. महेश कागणे यांनी मांडली. माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार बालाजी पाडदे यांनी पैरवी अधिकारी म्हणूनकाम पाहिले.
महिला वाहकास मारहाण करणाऱ्यास शिक्षा
