नांदेड(प्रतिनिधी)-26 फेबु्रवारी झालेला अमोल भुजबळे उर्फ एम.जे.चा खून कट रचून करण्यात आला आहे. त्यामुळे त्या गुन्ह्यात गुन्हेगारी कट रचणे हे कलम वाढविण्यात यावे आणि एफआयआर नोंदवतांना गुन्ह्याचे स्वरुप बदलणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करून त्याची विभागीय चौकशी व्हावी अशी मागणी करणारे निवेदन रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजू सोनसळे आणि महानगराध्यक्ष राहुल चिखलीकर यांनी शिवाजीनगर पोलीसांना दिले आहे.
दि.26 फेबु्रवारी रोजी सकाळी गणेशनगर येथील वायपॉईंटजवळ दोन युवकांनी खोब्रागडेनगरमध्ये राहणारा युवक अमोल चांदु भुजबळे याची कु्रर हत्या केली. त्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी त्याच्यावर जिवघेणा हल्ला सुध्दा झाला होता. त्याचा गुन्हा लिंबगाव पोलीस ठाण्यात दाखल आहे. या घटनेचा कट रचून तो अंमलात आणणारा मास्टर माईंड मात्र बाजूला राहिला आहे. हा गुन्हा शिवाजीनगर पोलीसंानी दाखल करतांना भारतीय न्याय संहितेचे कलम 61(2) अर्थात खूनाचा कट रचने हे कलम जोडलेले नाही म्हणून गुन्हा क्रमांक 77/2025 मध्ये या कलमाची वाढ व्हावी.
या निवेदनात संबंधीत घटनेचा एफआयआर नोंदवतांना टाळाटाळ करुन गंभीर गुन्ह्याचे स्वरुप बदलून दाखवले. हा सुध्दा गंभीर प्रकार आहे. त्या संबंधीत अधिकाऱ्याला निलंबित करून त्याची विभागीय चौकशी करण्यात यावी. तसेच या गुन्ह्याच्या कलमांमध्ये 166, 167, 217, 218 या भारतीय दंड संहितेची वाढ व्हावी असे या निवेदनात म्हटले आहे.रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे निवेदन शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे यांना दिले आहे.
एम.जे.खून प्रकरणात कटाचे कलम वाढवा-रिपब्लिकन सेनेची मागणी
