अकोला :- जी. डी. सी. अँड ए आणि सीएचएम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ७ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.
शासकीय सहकार व लेखा पदविका (जीडीसी अँड ए), तसेच सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सीएचएम) परीक्षा दि. २३, २४ व २५ मे रोजी होणार आहेत. परीक्षेसाठी gdea.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दि. ७ मार्च रोजी रा. ८ वाजेपर्यंत भरता येईल. बँकेत चलनाने भरणा करण्याची मुदत दि. १३ मार्च रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत करण्यात आली आहे. अकोला येथील परीक्षा केंद्रावर अकोला, वाशिम, बुलडाणा हे तीन जिल्हे संलग्न आहेत.