“राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांची विशेष तपासणी मोहीम सुरु”

नांदेड -राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांची विशेष तपासणी मोहीमेचे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबीटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे उद्घाटन सोहळा पार पडला.

राज्यातील सर्व जिल्हे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSKआरबीएसीके) उद्घाटन सोहळ्यास व्हिडिओ कॉन्फरन्स (VC) च्या माध्यमातून उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते.

त्यानुसार आज 1 मार्च 2025 रोजी नांदेड जिल्हास्तरीय उद्घाटन प्राथमिक व माध्यमिक शाळा जंगमवाडी महानगरपालिका नांदेड येथे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, डॉ. निळकंठ भोसीकर (जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय नांदेड), डॉ. संजय पेरके अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, डॉ. संतोष सूर्यवंशी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, डॉ. राजाभाऊ बुट्टे निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं) नांदेड, श्री अनिल कांबळे आर बी एस के जिल्हा समन्वयक, श्री विठ्ठल तावडे डी आय सी व्यवस्थापक हे उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांची विशेष आरोग्य तपासणी मोहिमेची सुरुवात आर बी एस के पथकातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात आली असून या शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांचे सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली, नेत्रदोष, रक्तक्षय चाचणी करण्यात आली. किरकोळ आजारी विद्यार्थ्यांना औषधोपचार देण्यात आले तसेच संदर्भसेवेसाठी पात्र विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. तसेच तालुका स्तरावरील शारदा भवन हायस्कूल अर्धापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरबन भोकर, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बिलोली, मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल देगलूर, ग्रीन फील्ड नॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज धर्माबाद, अनुसुचित जाती मुलाची शाळा हादगाव, जिल्हा परिषद नेहरू नगर हिमायत नगर, मनोविकास प्राथमिक शाळा, कंधार, सरस्वती विद्या मंदिर किनवट, जिल्हा परिषद शाळा लोहा, अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकिय शाळा माहूर, श्री सरस्वती विद्या मंदिर मुदखेड, जिल्हा परिषद हायस्कूल मुखेड, लिटिल स्टेप इंग्लिश स्कूल नायगाव, व कस्तुरबा गांधी बालिका वि‌द्यालय उमरी इत्यादी शाळांत स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या शुभहस्ते पार पडला.

“जिल्ह्यातील सर्व 0 ते १८ वयोगटातील बालकांमधील जन्मतः दोष, पोषण अभाव, व्याधी, विकासाला उशीर इत्यादी विकारासंबंधी मोफत तपासणी आणि सुरुवातीचे औषधोपचार या विशेष मोहिमेंतर्गत करण्यात येणार असून गरजेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले आहे. तसेच आमदार महोदयांनी शासनाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमास शुभेच्छा देऊन सदर तपासणी मोहिमेत प्रत्येक बालकाची तपासणी केली जाणार असल्याने बालकांच्या पालकांनी तपासणी पथकास योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.”

आरोग्य तपासणी दरम्यान मनपा जंगमवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्रामराव पांडुरंग साबळे, म.न.पा.गणेश नगर शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती आल्लमवाड, मनपा आंबेडकर नगर मुख्याध्यापिका श्रीमती अशाबाई घूले मनपा लेबर कॉलनी येथील शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेश्मा बेगम म व त्यांचे सहशिक्षक सहकाय लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!