घराघरात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेचा प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे – डॉ.पृथ्वीराज तौर

 

नांदेड:- उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय कार्यालय नांदेड आयोजित नांदेड ग्रंथोत्सव 2024 दुसऱ्या दिवशी परिसंवाद या कार्यक्रमात” मराठी भाषा संवर्धन आणि घराघरातील प्रयत्न” या विषयावर परिसंवाद संपन्न झाला.

मराठी भाषा संवर्धन आणि घराघरातील प्रयत्न या विषयावर माननीय डॉ. पृथ्वीराज तौर (स्वा.रा.ति.म.विद्यापीठ नांदेड,)हे या विषयावर परिसंवाद या कार्यक्रमात बोलत असताना घराघरात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेचा प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे सध्याच्या काळात मराठी भाषा गुदमरते आहे ही दुर्दैवाची बाब असून आपण आपली बोलीभाषा बोलली पाहिजे.

कोणतीही भाषा सामान्य माणसावर तग धरून जिवंत राहते. चांगली मराठी भाषा बोलण्यासाठी एम.ए. मराठी होण्याची गरज नाही सामान्य माणूसही चांगली भाषा बोलू शकतो . आपला मराठी भाषेवर विश्वास राहिला पाहिजे पण आज दुर्दैवाची बाब ही आहे की, आपण आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकवीत आहोत त्यामुळे आम्ही आम्हाला फसवत आहोत.

प्रख्यात जयंत नारळीकर,अच्युत गोडबोले असे अनेक विद्वान माणसे मराठी भाषा हे ज्ञान भाषा व्हावी म्हणुन त्यांनी ऑटोकाठ प्रयत्न करून आपले सर्व साहित्य मराठीतून लिहिले सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून एखादी भाषा ज्ञान भाषा बनते तेव्हा सर्वांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य केले पाहिजे. सर्वांनी या दृष्टीने प्रयत्न केला तो दिन सोनियाचा असेल असे विचार डॉ. पृथ्वीराज तौर यांनी प्रकट केले.

या परिसंवादात शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमतीसुचिता खल्लाळ यांनी सांगितले की, आज मराठी भाषेची अस्मिता कमी होत आहे काय. याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मराठी भाषेची प्रतिष्ठा व अस्मिता कमी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. डॉ. प्रा. शारदा कदम

बहिर्जी महाविद्यालय वसमत यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी अनेक साधुसंतांनी व महापुरुषांनी मोलाचे योगदान दिले आहे. घरात दोन तास मोबाईल शिवाय, एक तास वाचन करणे गरजेचे आहे. वाचन संस्कृती वाढण्यासाठी वाचकांना बळ द्या त्याचे कौतुक करा व पुरस्कार देऊन गौरव करा. वाचनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. हजारो वर्षाची परंपरा आहे ती भाषा उन्नत कशी राहील याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महंत प्रभाकर बाबा कपाटे नांदेड यांनी तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी सर्वांचे आभार मानले मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास चंद्र गायकवाड,अजय वट्टमवार, संजय पाटील, गोविंद फाजगे, संतोष इंगळे पाटील, शिवाजी हंबीरे, माधवराव जाधव, निर्मल कुमार सूर्यवंशी, उत्तम घोरपडे इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!