तंत्रज्ञान उद्योगात होणारे बदल विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे – प्राचार्य डॉ.एस.डी.शिरबहादुरकर

 

डी वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात “डेव्हलपर स्टुडंट क्लब” चा शुभारंभ

पुणे,तळेगाव:- सातत्याने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञान उद्योगात होणारे बदल विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे ही काळाची खरी गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.एस.डी.शिरबहादुरकर यांनी केले.डेव्हलपर स्टुडंट क्लब (डीएससी) च्या उद्घाटनपर कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

डॉ.डि.वाय.पाटील टेक्निकल कॅम्पस, वराळे, तळेगांव, पुणे येथे डेव्हलपर स्टुडंट क्लब (DSC) चा उद्घाटनपर कार्यक्रम दिनांक २८ मार्च २०२५ रोजी पार पडला, याप्रसंगी *प्राचार्य डॉ.एस.डी. शिरबहादुरकर आणि अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ.योगेश* यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “आजचे जग विज्ञान आणि तंत्रज्ञानावर अवलंबून आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जागरूकता आणि कुतूहल जागृत करणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विचार, प्रयोग आणि सर्जनशीलता विकसित करण्याची संधी मिळते.”

या यशस्वी उपक्रमाबद्दल महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि असे शैक्षणिक उपक्रम सुरू ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमासाठी *संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुशांत पाटील आणि सीईओ अ‍ॅड.अनुजा पाटील* यांनी दिलेल्या सततचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. सदरील कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सदरील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, डीएससी कोअर टीम आणि सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा.निशिकेत बनसोडे* यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन *राजनंदिनी पाटिल व पार्थ पालिमकर* या विद्यार्थ्यांनी केले. आभार प्रदर्शन *प्रा.निशिकेत बनसोडे* यांनी प्रभावीपणे केले.

DSC उपक्रमा अंतर्गत भविष्यातील योजना

डेव्हलपर स्टुडन्ट क्लब अंतर्गत विद्यार्थी नव्या तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळा, हेकेथान आणि तांत्रिक सत्रांचे आयोजन करणार आहे. त्यामुळे नवकल्पना, सहकार्य आणि आधुनिक कौशल्य विकासासाठी एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. नवीन तंत्रज्ञान शिकूया, प्रयोग करूया आणि यशस्वी भविष्यासाठी पुढे जाऊया..!! असा संदेश यामधुन देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!