स्वारगेट बसस्थानकात एका युवतीसोबत दुष्कर्म करणारा युवक 500 पोलीसांच्या तांत्रिक, शारिरीक, श्वान पथक या सर्वांच्या मेहनतीनंतर 72 तासांनी पकडला गेला. काल दि.28 फेबु्रवारी रोजी पुणे न्यायालयाने दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. दरम्यान 72 तासांमध्ये या प्रकरणाच्या झालेल्या मिडीया ट्रायलने या प्रकरणातील हवा काढून घेतली आहे. आजच्या परिस्थितीत पोलीसांना फिर्यादीप्रमाणेच काम करावे लागेल पण खटल्याच्या दरम्यानचे मुद्दे आजच उपस्थित केल्यामुळे काही जणांना दत्तात्रय गाडेची दया यायला लागली आहे. काही जण त्याला अबु्र नुकसानी मिळावी असे कॉमेंटस् करत आहेत.
शनिवार दि.22 फेबु्रवारी रोजी स्वारगेट पुणे येथील बसस्थानकात एका 26 वर्षीय युवतीवर अत्याचार झाल्याची तक्रार स्वारगेट पोलीस ठाण्यात घटनेच्या बऱ्याच कालवधीनंतर दाखल झाली. या बसस्थानकात 32 सुरक्षा रक्षक आहेत. त्या सर्वांना निलंबित करण्यात आले आहे. घटने संदर्भाने खुप काही न लिहिता आम्ही असे मुद्दे मांडू इच्छीतो की, जे तपासापुर्वी पोलीसांनी सुध्दा उघड करायला नको होते आणि दत्तात्रय गाडेच्या वकीलांनी सुध्दा तसे करायला नको होते. पण त्या तथाकथीत शिवशाही बसमध्ये अनेक साड्या सापडल्या, काही सोलापूर पांघरुन दिसले. कंडोम, गुटख्याच्या पुड्या आणि त्या बसची अवस्था थुंकून थुंकून किती छान दिसत असेल हे लिहिण्याची गरज नाही. या प्रकरणात ती बस स्वारगेट बसस्थानकात का थांबली होती. ती बस दुसऱ्या कोणत्या गावातून आली होती आणि तेथे कधी परत जाणार होती याचा काही उल्लेख नाही. ती बस बंद असेल तर बसस्थानकात का थांबली. तिला तर डेपोमध्ये थांबायला हवे. त्या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमधील चित्रांवरूनच दत्तात्रय गाडेची ओळख झाली. पण ते सीसीटीव्ही फुटेज फक्त ओळख पटविण्यापुरतेच होते काय ? कारण आज एका युवतीने आपली अबु्र गेल्याची तक्रार दिली आहे आणि अब्रु लुटणारा सांगतो आहे की असे काही घडलेच नाही.
तक्रार किती खरी किती खोटी हे आज ठरत नसते. काही पोलीसांनी सुध्दा टी.व्ही.ला मुलाखत देतांना सांगितले की, त्या युवतीने गलका केलाच नाही. गलका केला असता तर त्या ठिकाणी असंख्य लोक होते त्यातील काही तरी तिच्या मदतीला आले असते. न्यायालयात सादरीकरण करतांना या प्रकरणाच्या तपासीक अंमलदारांनी पोलीस कोठडी का हवी असते याचे सविस्तर विवेचन केले. त्यात स्वारगेट पोलीस ठाण्याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासायचे आहेत. आरोपीच्या मदतीला अजून कोणी होते काय याचा शोध घ्यायचा आहे. हा घटनाक्रम तपासीक अंमलदार ज्यावेळेस मांडत होते. त्यावेळेपर्यंत तर न्यायाधीशांनी सुध्दा या प्रकरणातील मिडीया ट्रायल पाहिले असेल, वाचले असेल. अर्थात त्यांच्या त्या पाहण्याचा आणि वाचनाचा परिणाम सुध्दा पोलीस कोठडीच्या निर्णयात झाला नसेल असे म्हणतात येणार नाही. पोलीसांनी 14 दिवस पोलीस कोठडी मागितली होती. परंतू न्यायालयाने 12 दिवस मंजुर केली.
या उलट आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडेच्या सांगण्याप्रमाणे दत्तात्रय गाडेची ओळख त्या युवतीसोबत खुप दिवसांपासून होती. त्याचा आकडापण वकीलांनी सांगितला आहे. तो 31 दिवसांचा आहे. त्या युवतीला दत्तात्रय गाडेने 7500 रुपये दिले होते. तो पळून गेला नव्हता. बसमध्ये प्रवेश करतांना अगोदर युवतीने प्रवेश केला होता त्यानंतर दत्तात्रय गाडेने. परत उतरत असतांना अगोदर दत्तात्रय गाडे उतरला होता आणि त्यानंतर युवती उतरले. ते दोघे तेथून सोबतच आले. याची सुध्दा सीसटीव्ही फुटेजमध्ये उपलब्धता असेल. तसेच दोघांचे सीडीआर, एसडीआर तपासले तर त्यांच्या महिन्याभराची ओळख सिद्द होईल. गाडेच्या वकीलांनी सांगितले की, 50 मिटरवर पोलीस ठाणे स्वारगेट आहे. ती तेथे गेली नाही, ती आगार प्रमुखाकडे गेली, तीने 112 क्रमांकाला कॉल केलेला नाही. ती सुशिक्षीत आणि नोकरी करणारी युवती आहे तर तिला हे सर्व माहित असणारच. ती आपल्या गावाकडे जाण्यासाठी नंतर बसमध्ये बसली. बसमधून तीने आपल्या मित्राला फोन केला आणि त्याने सांगितल्यानंतर हडपसर येथे उतरली आणि परत स्वारगेटला आली आणि तिने तक्रा्रर दिली.
खरे तर हे सर्व मुद्दे खटला चालतांना उचलण्याचे असतांना दत्तात्रय गाडेच्या वकीलांनी पोलीस कोठडीच्या निकालानंतर पत्रकारांसमोर सांगून टाकले. एका महिला पत्रकाराने गाडेच्या वकीलांना तुमचे मत काय असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले आहेत माझ्या मताचा विषय नाही. मी दत्तात्रय गाडेचा वकील आहे. त्याच्याविरुध्द असलेल्या खटल्यात त्याला न्याय मिळण्यासाठी मदत करणे हे माझे काम आहे. त्यावर अगोदर सहा खटले सुरू आहेत. पण त्यात एकाही खटल्यामध्ये त्याला अजून शिक्षा झालेली नाही. म्हणून त्याला सवईचा गुन्हेगार म्हणता येत नाही. या संघटनेच्या संदर्भाने पत्रकारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ंना बदलापूरच्या अक्षय शिंदेसारखेच दतात्रय गाडेचे होणार काय या प्रश्नावर बोलतांना फडणवीस यांनी या प्रकरणाच्या संदर्भाने आज काही बोलणे लवकर होईल असे सांगून वेळ पुढे ढकलला.
त्या बसमध्ये झालेले चित्रीकरण पाहिले असता त्यात अनेक साड्या दिसतात, सोलापूरी पांघरून आहेत. गुटख्याच्या पुड्या आणि थुंकण्याचा प्रकार एवढा घाणेरडा आहे की, ते वर्णन करणे अवघड आहे. शिवशाही बस आहे ती, वातानुकूलीत संरचना आहे त्या बसची, त्या बसमध्ये अनेकवेळेस वाहक नसतो. अशा परिस्थितीत त्या बसची झालेली ही दुर्दशा काय सांगते. अशाच काही बसेस शिवाई या नावाने नव्याने सुरू झाल्या आहेत. त्यातील काही गाड्यांमधील कंपनीमधून येणारी प्लॅस्टीकची अवरणे निघाली नाहीत. परंतू ए.सी.स्विच खराब आहेत, मोबाईल चार्जन स्विच खराब आहेत. त्या बसेसची सफाई होत नाही आणि शिवशाही आणि शिवाई गाड्यांचा दर जास्त आहे. मग यााची देखरेख कशी होणार हाही प्रश्न या गुन्ह्याच्या निमित्ताने समोर आला आहे.