तथाकथीत सदगुरू जग्गी वासुदेवनची सत्यता शोध पत्रकारीतेतून समोर आली

शोध पत्रकारीता करतांना खरच दम लागतो. पैसे कमावण्यासाठी केलेली पत्रकारीता ही विकलेली पत्रकारीता असते. पण ते खरा बहाद्दर पत्रकार शाम मिरासिंह यांनी मुळ उत्तर प्रदेशातील असतांना तामिळनाडु राज्यातील तथाकथीत सद्‌गुरू जग्गी वासुदेवन यांच्यात आणि त्यांच्या शिष्येमध्ये झालेला ईमलेल संवाद क्रॅक केला आणि इशा फाऊंडेशनची सत्यता जगासमोर आणली. ही सत्यता पाहुन कार्यवाहीची मागणी शाम मिरासिंह यांनी केली. परंतू अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. खरे तर शाम मिरासिंह यांनी उघड केलेले प्रकरण पोक्सो कायद्याअंतर्गत येते. पण कार्यवाही मात्र नाही. कारण तामिळनाडु पोलीस जग्गी वासुदेवनच्या खिशात आहेत. एवढेच नाही तर काल-परवा झालेल्या महाशिवरात्रीच्या पर्वावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुध्दा इशा फाऊंडेशनच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मग शाममिरासिंह यांच्या मागणीवर कोण विचार करेल. परंतू शाम मिरासिंह यांनी केलेल्या कामाची प्रशंसा आम्ही केली नाही तर आम्ही आमच्या लेखणीसोबत बेईमानी करू.
मुळ उत्तर प्रदेशचे राहणारे आणि पत्रकारीतेचा अभ्यासपुर्ण करून पत्रकार झालेले शाममिरासिंह यांनी अत्यंत भारी शोध पत्रकारीता केली. त्यानुसार त्यांनी इशा फाऊंडेशनचे प्रमुख जग्गी वासुदेवन आणि त्यांची भक्त मॉं प्रत्युता यांच्यामध्ये झालेला ईमेल संवाद क्रॅक केला. तसेच कैलाश मानसरोवर येथे झालेल्या एका कार्यक्रमाचा व्हिडीओ मिळवला. यात ई मेल संदेश असा आहे की, मॉं प्रत्युताने जग्गी वासुदेवन यांना ईमेल पाठविला. त्यात त्यांनी असे लिहिले आहे की, आमच्या येथे बाल ब्रम्हचारी दीक्षा घेण्याऱ्या अल्पवयीन बालिकांच्या शरिरावरील वरच्या भागातले कपडे काढायला लावले जातात. हे बरोबर नाही. त्यात बदल व्हायला हवा. कारण आज जग बदलले आहे. आमच्याकडे ज्या बाबी गुप्त ठेवायच्या आहेत. त्या बाबी उघड होण्याची शक्यता आहे. तसेच दुसरा मुद्दा असा होता की, या बालिकांना सकाळी 3.30 वाजता उठविले जाते. ते त्यांच्या वयाच्या मानाने त्यांना अवघड होत आहे. म्हणून त्यांच्या उठण्याचा वेळ 4.30 करण्यात या वा. या मॉं प्रत्युताच्या विचारणेवर जग्गी वासुदेवन यांनी एस.फॉर बोथ असे उत्तर लिहिले आहे. हे ईमेल पत्रकार शाम मिरासिंह यांनी कसे मिळवले. याची कमालच आहे. असो पण त्यांनी केलेल्या या शोध पत्रकारीतेला सलाम आहे.


मॉं प्रत्युत्ताने लिहिलेल्या दोन्ही मुद्यांना जग्गी वासुदेवन हे तथाकथित सद्‌गुरू एस असे म्हणत आहेत तर याचा अर्थ मॉं प्रत्युताने लिहिलेले मुद्दे बरोबर आहेत. पोक्सो कायदा 2012 प्रमाणे अल्पवयीन बालिकांना त्यांच्या शरिराचे कपडे काढायला लावणे हा अपराधच आहे. तसेच त्यांच्या नियमित आरामाच्या वेळेत बाधा बनणे सुध्दा बालकांवरील अत्याचार आहे. या बाबीला बातमी करून शाममिरासिंह यांनी कार्यवाहीची मागणी केली आहे. कोण करेल ही कार्यवाही कारण इशा फाऊंडेशनचे प्रमुख जग्गी वासुदेवन हे प्रबुध्द व्यक्ती आहेत आणि अशा प्रबुध्द व्यक्तींचा प्रभाव युवा वर्गात जास्त आहे. पण प्रबुध्द व्यक्ती सुध्दा कधी-कधी मुर्ख बनतात. याची कबुली बॅरिस्टर रामजेठमलानी आणि भारतीय जनता पार्टीचे नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी दिलेली आहे. त्यांनी सांगितले आहे की, 2014 मध्ये आम्ही मुर्ख बनलो हे आता आम्हाला कळले आहे. पण त्यांनी हे सांगितले तो पर्यंत बराच उशीर झालेला होता. असाच प्रकार बाबांचा असतो.बाबा एखाद्या झोपडीत बसला आहे आणि कोणी त्याच्याकडे जातच नाही मग त्याची ख्यातील जग्गी वासुदेवन सारखी होत नाही. असे बाबा मास हिप्नोटीझम करण्यात माहिर असतात आणि ज्यांचे मनोबळ दृढ्‌ नसते ते अशा बाबांच्या लफड्यात बसतात. कारण बाबांकडे जातांना आम्ही आमच्या भौतिक अडचणी घेवून जातो आणि त्या अडचणी दुर होतील या आशेमध्ये आम्ही बाबांचे सर्व ऐकतो. पण जेंव्हा आम्हाला कळते. तेंव्हा मात्र खुप उशीर झालेला असतो.


जग्गी वासुदेवन यांचे अजून एक शिष्या आहेत भारती वरदराजन या 1990 पासून बाबांच्या सेवेत आहेत. इशा फाऊंडेशनसह इतर सहा कंपन्यांमध्ये त्या संचालक आहेत. शाम मिरासिंह यांनी जग्गी वासुदेवनचा एक व्हिडीओ प्राप्त केला. तो व्हिडीओ कैलाश मानसरोवर जवळचा आहे. काही निवडक भक्तांसमोर जग्गी वासुदेवन व्याख्यान देत आहेत. त्यानंतर त्या व्हिडीओमध्ये असे चित्रीकरण आह ेकी, आभाळाकडे तोंड करून झोपलेल्या एका महिलेजवळ जाऊन बाबा त्या महिलेच्या गुप्तअंगावर आपला पाय ठेवतात आणि ती महिला माझ्यात भयंकर बदल झाला असे सांगत आहे. पुढे या व्हिडीओची चर्चा झाली तेंव्हा भारतीय वरदराजनने ती महिला मीच होते असे सांगितले. ही कोणती दीक्षा आहे. आजपर्यंत तरी आम्हाला माहित असलेल्या धर्मशास्त्रांच्या नुसार, अध्यात्मातील विवेचनानुसार अशी कोणतीच भिक्षा नसते. मग जग्गी वासुदेवनवर कार्यवाहीची केलेली मागणी काय चुकीची आहे.
एका विदेशी भक्ताने जग्गी वासुदेवन यांना 4 विदेशी दुचाकी भेट दिल्या होत्या. त्यांच्या मुलीसुध्दा बाबांच्या आश्रमात होत्या. पण त्या भक्ताला सत्य कळल्यानंतर त्याने आपल्या मुली आपल्या घरी नेल्या. सोबतच दोन भारतीय अल्पवयीन बालिकांच्या बाबात असाच प्रकार घडला होता. तामिळनाडु उच्च न्यायालयाने याबाबत कार्यवाही करण्याची सुचना केली होती. परंतू भारताचे महान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी ती संचिकाच सर्वोच्च न्यायालयात मागवून घेतली आणि ती कार्यवाही तशीच मागे पडली. त्यावेळी इशा फाऊंडेशनने अल्पवयीन बालिका त्यांच्या पालकांच्या मर्जिनेच आश्रमात येतात असे स्पष्टीकरण दिले होते. बाबा कर नाही तर डर कशाला. या युक्तीप्रमाणे शाममिरासिंह यांनी केलेल्या आरोपांबद्दलज नक्कीच एकदा चौकशी व्हायला हवी. ज्यातून कोणाची चुक असेल ती समोर येईल आणि जो चुकला असेल. त्याला त्याची शिक्षा मिळेल. एकंदरीत मात्र पत्रकार शाम मिरासिंह यांनी केलेल्या शोध पत्रकारीतेबद्ल त्यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!