नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष बंटीभाऊ लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान, मिठाई, फळ व महिलांसाठी साड्या, ब्लँकेट वाटप असे विविध सामाजीक उपक्रम दि.27 फेब्रुवारी रोजी राबविले जाणार आहेत.
राष्ट्रवादीचे युवा नेते बंटीभाऊ लांडगे हे नेहमीच सामाजीक उपक्रम राबवून सामाजीक बांधीलकी जोपासत असतात. मित्रमंडळाच्यावतीने दरवर्षी बंटीभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजीक उपक्रम घेतले जातात. यावर्षी दि.27 फेब्रुवारी रोजी नांदेड शहरामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असून विष्णुपूरी येथील शासकीय रूग्णालयात अन्नदान, शहरातील वृध्दाश्रमात मिठाई वाटप व आयुर्वेदिक महाविद्यालयात फळ वाटप यासह नांदेड शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरातील निराश्रीत लोकांना ब्लँकेट वाटप आणि गोरगरीब महिलांना साडी वाटप अशा सामाजीक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती बंटीभाऊ लांडगे मित्रमंडळाच्यावतीने देण्यात आली आहे.